
जालिंदर आल्हाट
ब्युरो चीफ
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क
राहुरी शहरातील स्टेशन रोड वर रस्ता दुभाजक निर्मितीला विरोध हा देवेंद्र लांबे यांची केवळ स्टंट बाजी असून दुभाजक न टाकल्याने होणाऱ्या आघाताची जबाबदारी विरोध करणारे घेणार का?असा सवाल सामाजिक कार्यकर्ते विक्रम गाडे यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत गाडे यांनी म्हटले आहे की काही दिवसांपूर्वी शहरातील भगीरथीबाई तनपुरे शाळा ते पाण्याची टाकी या रस्त्यावर दुभाजक टाकण्यास याच व्यक्तींने विरोध केला होता. आज ही स्टेशन रस्त्यावर दुभाजक बसवण्यास विरोध करित आहे. वस्तुस्थिती पाहता नव्याने निर्माण झालेल्या स्टेशन रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते,तालुक्याचे पूर्व भागात जाणारी वाहने, तहसील,पंचायत समिती पोलीस स्टेशन ला जाणारी वाहने या समवेत राहुरी कॉलेजहून शहरात येणारे विद्यार्थी या रस्त्याने ये जा करत असतात,याचं रस्त्यावर अनेक हॉस्पिटल्स आहेत त्यांची ही कायम गर्दी असल्याने या रस्त्यावर दुभाजक अत्यंत आवश्यक आहेत.
दुभाजक टाकल्याने भविष्यात घडणारे अपघात व त्यातून होणारी जीवीत हानी टाळली जाऊ शकते मात्र काही मंडळी आपल्या प्रसिद्धी साठी स्टंटबाजी करत आहेत.दुभाजक न टाकल्याने भविष्यात या मार्गावर जीवीत हानी झाल्यास विरोध करणाऱ्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची लेखी हमी हे विरोध करणारे देतील काय असा सवाल ही गाडे यांनी उपस्थित केला आहे.
शहर विकास व नागरिकांचे हिताचे व सुरक्षा देणारे कामांना विरोध न करता सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन विक्रम गाडे यांनी केले आहे.














