prabodhini news logo
Home ठळक बातम्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचा अपमान करणाऱ्या बार चालक मालकावर गुन्हा...

विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचा अपमान करणाऱ्या बार चालक मालकावर गुन्हा दाखल करून बार व दारूचा परवाना रद्द करा:- राजु झोडे

0
69

शैलिका सागवरे
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

दुर्गापुर:- दुर्गापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिमरन बार, राज बार व देशी भट्टी असलेल्या मालकाच्या दारूच्या दुकानाच्या शौचालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावल्यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली असून उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह दुर्गापूर पोलीस स्टेशन मध्ये सदर बारच्या बारमालकाविरुद्ध तक्रार दाखल केली.
देशी दारूच्या शौचालयाच्या ठिकाणी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावलेला आढळून आला. शौचालयाच्या ठिकाणी बाबासाहेबांचा फोटो लावून या बारमालकानी संपूर्ण देशाचा अपमान केलेला आहे. ही घटना फार गंभीर असून सदर बार मालका विरोधात तात्काळ दुर्गापुर पोलीस स्टेशनमध्ये या विषयाची तक्रार दाखल करण्यात आली. अपमान करणाऱ्या बारमालकासह बार चालवणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा तसेच सिमरन बार, राज बार व देशी दारूचा परवाना रद्द करून कठोर कारवाई करावी अशी निवेदनात तक्रार करण्यात आली.
जर पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही तर या विरोधात तीव्र जनआक्रोश करण्याचा इशारा राजू झोडे, रवि पवार, विनीत तावाडे, संदेश दुर्योधन,सुरज वाकडे, डॉ पियुश मेश्राम,निशाताई धोगडे,रत्नमाला ईलमकर, संगीता नंदेश्वर,कांचन साखरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here