prabodhini news logo
Home चंद्रपूर बल्लारपूर येथे हाप पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

बल्लारपूर येथे हाप पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

0
166

माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

बल्लारपूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

तालुक्यातील बल्लारपूर येथील जय गुरुदेव क्रिकेट क्लब बल्लारपूरच्या वतीने खास दीपावलीच्या शुभ पर्वावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बल्लारपूरच्या भव्य आवारात हाप पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे.
या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन नुकताच पार पडला. या स्पर्धेचे उद्घाटन माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून इंजी. बावनकर पं. स. ब्रम्हपुरी, मनोज कोडगले, अशोक मोरांडे, पितांबर कोडगले, डंबाजी ब्राम्हणवाडे, संजय भोयर, विलास दिवठे, ज्ञानेश्वर भोयर, भोलानाथ कोडगले, भानुदास भोयर, देविदास पालकर, मुखरू दिवटे व अन्य मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये हाप पीच क्रिकेट स्पर्धांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केल्या जातं आहे. जय गुरुदेव क्रिकेट क्लब बल्लारपूरच्या वतीने दिवाळीच्या शुभ पर्वावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात दिवाळीमध्ये उत्साहाचे वातावरण असते. या स्पर्धेमुळे गाव खेड्यातील नवीन खेळाडूंसाठी हि स्पर्धा उत्साहवर्धक ठरेल यात दुमत नाही. असे प्रतिवादन यावेळी केले.
या स्पर्धेमध्ये हजारोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. हाप पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या विजेत्या संघास विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कडून 11 हजार रोख, द्वितीय पारितोषिक माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या कडून 9 हजार रुपये रोख तर तृतीय पारितोषिक अमोल सुकारे, ज्ञानेश्र्वर दिवटे, अविनाश मस्के यांच्या कडून 7 हजार रुपये रोख बक्षीस देण्यात येईल. त्याचबरोबर स्पर्धेत अनेक पारितोषिक ठेवले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here