शेत मालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत शासनाने योग्य आधारभूत दर द्यावा – डॉ. नामदेव किरसान

0
68

प्रज्ञा निमगडे
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली

युवा गणेश मंडळ बेघरटोला येनापुर द्वारा आयोजित दि. 10 नोव्हेंबर 2023 रोजी मौजा येनापुर ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथे”नजर लागली संसाराला” या दंडारीच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या उद्घाटकीय भाषणात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान यांनी कृषी उत्पादनाला योग्य दर मिळत नसल्याचे सांगून यावर्षी सुद्धा धान खरेदीसाठी आधारभूत किंमत प्रति क्विंटल 2,183 रुपये शासनाने ठरवलेली आहे जी उत्पादन खर्चाच्या तुलनेत फारच कमी ठेवलेली आहे. अतोनात वाढलेल्या महागाईमुळे शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चात वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांच्या योग्य उत्पन्नाचा विचार शासनाने केलेला दिसत नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे व शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट दर देण्याचे आश्वासन फोल ठरलेले आहे. या हंगामात तरी शासनाने शेतमालाला योग्य दर द्यावा. शासन जर शेतकरी विरोधी धोरण अवलंबित असेल तर अशा लोकांना धडा शिकविण्याची गरज असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष निकेश गद्देवार, सह उद्घाटक साईनाथजी कोवे, यादव मेश्राम, संतोष गेडाम, गोपिका अंधारे, शितल अवतारे, प्रतिभा कोरडे, रेखा गेडाम, प्रमोदजी उमरे, विश्वास बोनगंटीवार, रुपेश टिकले, गुलाबरावजी गद्देवार, कडूजी गेडाम, मुकेशजी पाऊलबुद्धे, संजय बांबोडे, वसंत दांडेकर, बाळूभाऊ निखाडे, कोमल अक्केवार, पवन आत्राम व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here