शिरोळ प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
शिरोळ – या गावातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एक चांगला निर्णय घेतला. येथील सर्व ऊस उत्पादक शेतकरी मिळून गाव मिटिंग घेऊन नदीला पाणी कमी असलेने ऊसाला पाणी कमी पडत आहे. बोअरला पाणी कमी होत आहे.त्यामुळे ऊसपिक करपत आहे. म्हणून आम्ही टाकळीवाडीतील सर्व ऊस उत्पादक शेतकरी मिळून आमचा ऊस ,”ना आंदोलन ना संघर्ष” न करता आम्ही आमचा ऊस कारखान्याला तोडून देणार असे सर्व शेतकरी मिळून एकमताने निर्णय घेतला आहे. त्यावेळीं तुकाराम चिगरे, खुशाल कांबळे, बाबासाहेब वनकोरे,पी.मो.जमादार, चंद्रकांत निर्मळे, बाजीराव गोरे, धनपाल भमाणे,बजरंग गोरे, वसंत गोरे, भरत पाटील, वासूदेव खोत, तसेच टाकळीवाडीतील सर्व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

