

शैलिका सागवरे
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
भद्रावती- आज दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी मा.गट विकास अधिकारी, (मग्रारोहयो) पंचायत समिती, भद्रावती यांची आम आदमी पार्टी भद्रावती च्या शिष्टमंडळा नी भेट घेतली. गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत देशात खूप कामे होत असतात. तसेच एक काम आपल्या भद्रावती तालुक्यात धानोली ग्रामपंचायत गावाच्या जिल्हा परिषद शाळेत होत आहे. 2005 च्या कायद्यानुसार असे नियम आहे की, या राष्ट्रीय योजनेअंतर्गत रोजगार ज्यांना मिळतात ते कामाच्या जागेपासून ५ किलोमीटरच्या अंतराच्या आतच्या लोकांना किंवा मजुरांन कडूण योजनेचे कामे करून घेतल्या जाते. परंतु धानोली या गावात होत असलेल्या कामांमध्ये तसे होताना दिसत नाही आहे. आमच्याकडून ज्यावेळी तिथे चौकशी करण्यात आली, त्यावेळी तिथे पोंभुर्णा चे मजूर आढळले व त्या वेळेसचा आमच्याजवळ पुरावे सुद्धा आहे. तरी आपणास विनंती आहे की, या संदर्भात चौकशी करून योग्य ते कारवाही अधिकाऱ्यांवर करण्यात यावी ही विनंती. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा आपचे निखिल जट्टलवार यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन मार्फत दिले.
यावेळी आम आदमी पार्टी भद्रावती चे शहराध्यक्ष सुरज शाहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर उपाध्यक्ष आशिष तांडेकर, शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, आप नेते अतुल भैसारे, निखिल भाऊ जट्टलवार, वसीम भाई कुरेशी, सॅम्युअल गंधम, नितीन बावणे, शहर महिला अध्यक्ष प्रतिभा कडूकर, महिला कोषाध्यक्ष रेखा गेडाम, नयना गंधम, शहर सदस्य मंगेश खंडाळे, सुरज पुल्लरवार, डोलारा प्रभाग प्रमुख केशव पचारे, युवा सचिव अतुल रोडगे उपस्तीथ होते.














