

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
रत्नापूर येथे माना समाजाच्या वतीने बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम बिरसा मुंडा तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पूजन व माल्याअर्पण करण्यात आले. आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत सदस्य वासुदेव दडमल, ग्रामपंचायत सदस्य मंगेश मेश्राम,विश्वनाथ सावसाकडे, प्रमोद सावसाकडे, कविता सावसाकडे तसेच सिंदेवाही तालुक्यातील बार्टी समतादुत कृपाली धारणे उपस्थित होते.
कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून मंगेश मेश्राम यांनी बिरसा मुंडा यांच्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. आदिवासी समाजासाठी केलेले कार्य व त्यांचा इतिहास आठवणीत ठेवावा हे सांगितले त्याचप्रमाणे समतादूत कृपाली धारणे सुद्धा सविस्तर मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे अध्यक्षीय भाषणात सविस्तर अशी माहिती वासुदेव दडमल यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन अंजली वाकडे तर आभार अंकुश सावसाकडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशिस्वतेसाठी आदिवासी विद्यार्थी संघटना यातील सर्व सभासद यांनी परिश्रम घेतले.














