prabodhini news logo
Home चंद्रपूर नवरगाव येथे आज तालुकास्तरीय शेतकरी प्रशिक्षण

नवरगाव येथे आज तालुकास्तरीय शेतकरी प्रशिक्षण

0
216

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

कृषी विकास योजना सेंद्रिय शेतीअंतर्गत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी २३ नोव्हेंबर २०२३ला तालुकास्तरीय एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षणाचा कार्यक्रम सकाळी ११ वाजता रमाबाई जयस्वाल सभागृह नवरगाव, तालुका: सिंदेवहि जि. चंद्रपूर येथे आयोजित केला आहे.

प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन वरिष्ठ शास्त्रज्ञ व्ही. जी. नागदेवते यांच्या हस्ते होणार असून,अध्यक्षस्थानी प्रकल्प संचालक (आत्मा), कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा प्रीती हिरळकर या राहतील.प्रमुख अतिथी म्हणून तृणाल फुलझेले, अर्चना फुलसुंदर, स्नेहल मडावी, विनोद रहांगडाले, मयूर गड्डमवार, विषय तज्ज्ञ स्नेहा वेलादी उपस्थितराहणार आहेत.

शेतकरी प्रशिक्षणाला सेंद्रिय शेती करण्यास इच्छुक शेतकरी तसेच सुसंस्कृत शेतकरी, उत्पादक कंपनीचे सर्वच सभासद यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कृषी तंत्रज्ञान व्यवस्था यंत्रणा (आत्मा) विभाग व कृषी अधिकारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here