निशा सोनवणे
कोकण विभाग संपादक
प्रबोधिनी न्युज
मुंबई- दि. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वा. बी एम वैद्य सभागृह २ रा मजला, इंडियन एजुकेशन सोसायटी राजा शिवाजी विद्या संकुल गेट नं १२ राजगृहा जवळ हिंदु कॉलनी दादर, मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्यावतीने संविधान गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी एक लाख संविधान प्रति वितरणाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रसिद्ध प्रबोधनकार अनिरुद्ध जी बनकर यांचा संविधान पहाट ‘संविधानची गाणी अनिरुद्धची वाणी’ हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. तरी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

