लेखी तक्रार देऊनही काही कारवाई होत नाही
बळीराम लांडगे
तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज, उदगीर
उदगीर दि.२३ मुख्य डाकघर उदगीर अंतर्गत डिगोळ येथील डाकघर विभागातील पोस्टमेन जनतेचे टपाल वेळेवर देत नसल्याने जनतेतून खूप मोठ्या प्रमाणात राग व्यक्त केला जात आहे.
अधिक माहिती अशी की मुख्य डाकघर उदगीर अंतर्गत डिगोळ हे काही गावाचे डाकघर असून येथील पोस्टमेन हे आपले कार्यालयीन काम वेळेवर पूर्ण करत नसल्याने जनतेतून खूप मोठ्या प्रमाणात राग व्यक्त केला जात आहे तसेच ते आपल्या खाजगी कामाला जास्त वेळ व महत्त्व देत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्याकडे ज्या कोणत्या गावातील कार्यभार आहे त्या प्रत्येक गावातून त्यांच्याविषयी खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत.ते कोणाला फोन करत नाहीत आणि कोणी टपालधारकांनी फोन केला तर ते उचलत नाहीत. याविषयी वेळोवेळी मुख्य डाकघर उदगीर येथे कांही लोकांनी लेखी तक्रारी सुद्धा दिल्या आहेत तरीपण त्यांच्यावर आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली दिसून येत नाही.त्यामुळे उलट त्यांच्या कामामध्ये जास्त प्रमाणात आता दिरंगाई वाढली आहे.यांच्या विषयीच्या तक्रारी गेल्या अनेक वर्षापासून असून देखील मुख्य डाकघर उदगीर विभाग या कर्मचाऱ्याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष का करत आहे हे सुद्धा जनतेला कळत नाही.काही लोकांच्या तर तक्रारी अशी आहेत की ते वेळेवर आरडीचे हप्ते तसेच महिलांच्या विविध योजना आहेत त्यांचे सुद्धा ते हप्ते वेळेवर भरत नाहीत अशा सुद्धा तक्रारी आढळून आल्या आहेत.तसेच याविषयी त्यांना जाब विचारला असता ते अरेरावी तसेच उडवा उडीचे उत्तरे देतात आणि जा कोणाकडे जायचे आहे माझं काही होत नाही माझ्याकडे अतिरिक्त गावे असल्यामुळे मी टपाल वेळेवर देत नाही असे कारणे सुद्धा ते देतात.आमचे तालुका प्रतिनिधी यांनी मुख्य डाकघर येथे यांविषयी विचारणा केली असता तेथील कर्मचारी सुद्धा तो पोस्टमेन आमचा सुद्धा फोन उचलत नाही जनतेचा तर विषयच नाही अशी माहिती मिळाली.तसेच ते एका गावामध्ये आठ-आठ दिवस झाले तरी येत नाहीत आणि त्यांचा दिवसेंदिवस मनमानी कारभार जास्त चालू असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून त्यांच्यावर तात्काळ काहीतरी कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी जनतेतून मागणी होत आहे.

