
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
देशात संविधान विरोधी शक्ती वाढत असुन त्यांनी देशासमोर मोठे संकट उभे केले आहे. अशा वेळी संविधान मुल्यांवर निष्ठा असलेले भारतीय नागरिक संघटित होवुन या आव्हानांना तोंड देण्यासाठी पुढे यायला हवेत. संविधान दिवस व प्रस्ताविकेचे वाचन या कार्यक्रमाचे बीज भारतात व महाराष्ट्रात रोपायचे आहे.कारण हा जनतेला गुलामीतुन मुक्त करणारा उत्सव आहे. याच भावनेतून संविधान सन्मान दिन साजरा करण्याममागचे औचित्य आहे.
सिन्देवाही तालुक्यातील वाकल येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच व्दारा आयोजित संविधान सन्मान दिन सोहळा दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोज रविवारला बौध्द समाज सभामंच वाकल येथे करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता संविधान सन्मान महारॅली (सिन्देवाही) पासुन करण्यात आली. सायंकाळी ५ वाजता संविधान सन्मान महारॅली (वाकल) काढण्यात आली. सायंकाळी ६ वाजता मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. यात मार्गदर्शक म्हणून मा.नसिर जुम्मन शेख, मुख्य संपादक साप्ताहिक उची उडान जि गडचिरोली यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सागर गेडाम यांनी केले.
यावेळी मंचावर राहुल पंचभाई सरपंच वाकल, दिनेश मांदाळे उपसरपंच वाकल, राजु गजभिये, युनुस शेख नगरसेवक सिन्देवाही, विकास गेडाम, राहुल चिमलवार, निलिमा पोपटे, मंगला गावतुरे, नंदा भोयर, सविता कोकोडे, दिलीप गावतुरे, सिध्दार्थ पंचभाई, पितांबर नागदेवते, सुरेश नागदेवते, बौध्दप्रकाश नागदेवते, रामचंद्र मोहुर्ले, अक्षय चहांदे, महादेव भेंडारे, हरिश्चंद्र मांदाळे, क्रिष्णा मोहुर्ले, टेंभुर्णे मुख्याध्यापक, गोर्ले, श्रिरामे, उषा कावळे, वंदना कावळे, दिलीप गेडाम हे उपस्थित होते.
सायंकाळी ७ वाजता भोजनदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. रात्रौ ८ वाजता जे.के प्रस्तुत सुर नवा म्युझिकल ग्रुप तर्फे बुध्द-भीम गितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात गायक जगदिश गेडाम व प्रणय गजभिये यांनी गीते सादर केली. या सर्व कार्यक्रमाला बौध्द समाज वाकल व रमाई महिला मंडळ वाकल यांचे सहकार्य लाभले. सर्व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राहुल पंचभाई यांनी केले.











