चिमूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे दि. 28 नोंव्हेबर ला महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीदिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमीर धमानी सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. युवराज बोधे सरांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मृणाल व्हराडे सरांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमीर धमानी सर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर सखोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. संदीप मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. निलेश ठवकर सरांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

