नवरगाव येथे क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठया उत्सवात साजरी

0
150

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही

क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा आदिवासी समाज मंडळ नवरगाव यांच्या वतीने दिनांक 27 नोव्हेंबर 2023 सोमवार रोजी आदिवासी समाजाचे आद्यप्रवर्तक क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांची 148 वी जयंती व सप्तरंगी ध्वजारोहन कार्यक्रम पारंपरिक नृत्याने मोठया उत्सवात साजरा करण्यात आला. शल्ला शक्ती स्थळ बाजार चौक नवरगाव येथून मोठया प्रमाणात सर्व आजू बाजू परिसरातील आदिवासी बंधू- भगिनीनी सहभागी होऊन भगवान बिरसा मुंडाची भव्य अभिवादन मिरवणूक गावातील प्रमुख मार्गाने काढून चौका- चौका मध्ये आदिवासीचे पारंपरिक नृत्य सादर करून हि मिरवणूक शांततेत गावातून काढण्यात आली. हजारोच्या संख्येने सर्व आदिवासी बांधव या अभिवादन रॅली मध्ये भगवान बिरसा मुंडाच्या जय घोषाने नवरगाव नगरी मध्ये आदिवासी समाजाबद्दल नवचैतन्य निर्माण करण्यात आले. अभिवादन रॅलीचा समारोप नंदिनी सभागृहा मध्ये आदिवासी समाजाला मान्यवरांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून करण्यात आले.
कार्यक्रमाला उदघाटन म्हूणन प्रदेश महासचिव डाँ. नामदेव किरसान, अध्यक्षस्थ्यानी राष्ट्रीय निमंत्रक जनार्धनजी पंधरे तसेच प्रमुख पाहूणे म्हूणन केशवराव तिराणिक महाराष्ट्र प्रदेश सचिव अ.भा.आ.वि.प., जिल्याअध्यक्ष जनार्धन गेडाम, डाँ. श्रीकांत मसराम सहाय्यक अधीष्ठाता सिंधुदुर्ग, महासचिव अ. भा. आ. वि. प. प्रा. परशुराम उईके, लोकशाहीर बाबुराव जुमनाके, खोजरामजी मरस्कोले, सरपंच राहुल बोडणे, शहर अध्यक्ष सुशांत बोडणे, वाल्मिक पेंदाम,पुष्पा सिडाम,सुनील उईके, अरविंद परचाके, अभिजित संगेल व इतर प्रमुख पाहुण्याची उपस्थिती होती.
सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्याय व अत्याचारा संबंधी तसेच भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्यावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा आदिवासी समाज मंडळ नवरगावचे अध्यक्ष राजेंद्र नरपाचे सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव पंकज उईके तर आभार प्रदर्शन गीताताई सलामे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष सुरेश मडावी, कोषाअध्यक्ष जितू उईके, सहसचिव अजय पेंढारकर, सहकोषाअध्यक्ष नितीन गेडाम, महिलाअध्यक्ष सुनीता मडावी, सुनीता हेमंत मडावी, हर्षा परचाके,आबाजी मडावी, सोमेश्वर सिडाम, कृष्णदास परचाके, गोविंदा पेंदाम, गजानन गेडाम, मनोज आत्राम, वैभव सलामे, अरुण गेडाम, संजय गेडाम, स्वप्नील सुरपाम व सर्व आदिवासी बंधू भगिनीनी मेहनत करून कार्यक्रम यशस्वी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here