prabodhini news logo
Home अंजनगाव सुर्जी अंजनगाव तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीने शेतकरी अडचणीत

अंजनगाव तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीने शेतकरी अडचणीत

0
184

अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज अमरावती

अमरावती – जिल्ह्यातील (अंजनगाव सुर्जी) येथील दी.30 तालुका कृषी अधिकारी हे कार्यालयात गैरहजर राहत असल्याने त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारीही दांड्या मारताना दिसत आहे. परिणामी शेतीसंदर्भात समस्या घेऊन व कृषी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना आल्या पावली परतावे लागत आहे.

रामभरोसे कुणाचा वचक नाही वरिष्ठ अधिकारी सुद्धा उडवळीचे उत्तर देऊन हात झटकतातशेतकऱ्यांच्या समस्यांचा खच. फिल्डवर आहो. अशा अधिकाऱ्यांचे कृषी कार्यालयाला ग्रहण.

अंजनगाव सुर्जी तालुका कृषी कार्यालयात शेतीचा पीक विमा, पीएम योजना, ठिबक आणि तुषार योजना तसेच नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकाच्या नुकासानीची माहिती देण्यासाठी शेतकरी येतात. कृषी विभागाशी संबंधित योजनेचा लाभ मिळावा म्हणून दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी आपले ऑनलाइन फॉर्म भरले आहेत. परंतु हे अर्ज आतापर्यंत मंजूर सुद्धा झाले नाहीत.
नियमानुसार ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर सात दिवसात सेवा अधिनियम नियमानुसार हे अर्ज मंजूर करावे लागतात.
परंतु तालुका कृषी अधिकारी आर. बी. तराळे हे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नसल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे. काही अडचीनी बाबत माहिती मिळावी यासाठी शेतकरी आपल्या शेतीची कामे टाकून तालुका कृषी कार्यालयात येतात. परंतु तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अनुपस्थित राहत असल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप व आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. कार्यालयाला पूर्णवेळ तालुका कृषी अधिकारी मिळावा व शेतकऱ्यांच्या समस्यांचे निरसन व्हावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here