कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
पेंढरी (कोके.) येथील ग्रामपंचायत कार्यालयात सर्वसाधारण ग्राम सभा आयोजित करण्यात आली. सदर ग्राम सभेत तंटामुक्त समिती च्या अध्यक्षाची निवड करण्यात आली. त्यात घनश्याम चौके, सुधाकर चौधरी व विलास चौधरी यांची नावे आली. त्यात दोघांनी नावे मागे घेतली व सुधाकर चौधरी हे अविरोध निवडून आले. गावचे सरपंच तारा अरविंद राऊत यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.
सदर कार्यक्रमाला उपसरपंच निशांत चंद्रकांत शिंदे, माजी सभापती अरविंद राऊत, माजी प. स. सदस्य चंद्रकांत शिंदे, ग्राम पंचायत सदस्य दिवाकर चाचारकर, भक्तदास चौधरी, सचिन कराडे, ग्रामसेवक अमोल वाळके व नवनियुक्त पोलिस पाटील सत्वशिला महेंद्र राऊत तसेच ग्राम पंचायत कर्मचारी सचिन शेंडे व विकास कराडे उपस्थित होते.

