
शैलिका सागवरे
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर- दिनांक 30/11/ 2023 ला बल्लारपूर प्रकल्प व चंद्रपूर प्रकल्पातील सेविका मदतनीस यांनी पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी साहेबांना बेमुदत संपाचे निवेदन दिले. त्यामध्ये अंगणवाडी ताईं च्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहेत. 1) अंगणवाडी ताईंना वेतनश्रेणी लागू करा (कर्मचाऱ्यांच्या दर्जा दिला पाहिजे) 2) अंगणवाडी सेविका मदतनीस यांना पात्रतेनुसार मुख्य सेविका व सेविका म्हणून पदोन्नती करण्यात यावी.3) अंगणवाडीला मिळणाऱ्या टी. एच. आर. आहार बंद करण्यात यावा. याचे कारण असे की तो बालकांना पूरक आहार म्हणून देण्यास अयोग्य आहे. त्या ऐवजी ग्रामीण भागाप्रमाणे कडधान्य देण्यात यावे.4) बचत गटाला देण्यात येणारा गरम ताजा आहार पुरवठा बंद करून अंगणवाडी मार्फत शिजवण्यास देण्यात यावे.5) नवीन चांगल्या क्वालिटीचे मोबाईल टॅब किंवा लॅपटॉप देण्यात यावे. जेणेकरून ऑनलाइन काम करताना त्याचेसेविकेच्या आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाहीत.६) योग्यतेनुसार मदतनीसची सेविकाआणि सेविकेची मुख्य सेविका म्हणून रिक्त असलेल्या जागी निवड करण्यात यावी.7) अंगणवाडी सेविका मदतनीस यांना ग्रॅज्युएटी, पेन्शन योजना, मेडिकल खर्च, एक महिन्याच्या दोघी नाही उन्हाळी सुट्ट्या देण्यात याव्या.8) लोकसंख्येनुसार नवीन अंगणवाडीला मंजुरी देऊन अंगणवाडीचीनिर्मिती करण्यात यावी. अशाप्रकारे अंगणवाडी कार्यकर्त्याच्या मागण्या आहेत.तरी आमच्या मागण्याची शासन दरबारी तात्काळ दखल घेण्यात यावी. अन्यथा आम्ही चार 12 2023 पासून संपूर्ण सेविका मदतनीस बेमुदत संप पुकारू असे आवाहन शासनाला देण्यात आले याप्रसंगी जागृत कार्यकर्ते मंचाच्या तथा आयटक संघटनेच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होत्या.

सारिका उराडे, सावित्री गाठले, रेखा रामटेके, रूपाली सोनारकर, सुषमा वासेकर, रेखा कांबळे, सुमन डेकाटे, अनिता शिदुरकर, शीला बोलीवार, संघमित्रा खोब्रागडे, ज्योती सरकटे, आशा सूर्यवंशी, विद्या वासेकर, लता पेटकर, वंदना खेडकर, वैशाली पिदुरकर, मनीषा गावंडे, उषा मेंढे, भावना खोब्रागडे, मीना बर्मया, नीता बनसोड, नाजुका गेडाम, अनिता तिजारे, शाहीम शेख, नयना वाळके, ज्योती ले वर्षा आत्राम, आशा आवळे, उर्मिला पूडके, मीना सुरजा गडे, रोशनी सोनटक्के, लता लेनगुरे, शीला वाडके, मंगला मरापे, सुनिता येलमुले, तारा मावलीकर जिजा भांडेकर, छाया पडवेकर इत्यादी उपस्थित होते.














