
तात्काळ पंचनामे करून प्रशासनाने मदतीचा हात देण्यात यावा
अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज अमरावती
अमरावती – जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील फुबगाव, शिरजगाव अर्डक, माधान, ब्रा थंडी, शिरजगाव, वणी, सोनोरी गावातील शेतकरी यांना अवकानी पावसाने मोठा फटका बसला असून संत्रा कपाशी तूर हरभरा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या अवकानी पावसाने मोठ्याप्रमाणात हजेरी लावल्याने शेतकर्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकाळी पावसाने हीरावला आहे रविवारच्या रात्रीपासून सतत पाऊस पडत असल्याने शेतातील कपासी व तुरीचे पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बागायती पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पावसामुळे विक्री न झालेल्या संत्रांचे सुद्धा प्रचंड नुकसान झाले आहे. रविवार रात्रीपासून तर आज गुरुवार पर्यंत या अवकाळी पावसाने शेतकरी मेटाकुटीला आला आहे . सध्या कपासी वेचणीच्या कामाचा हंगाम सुरू झाला आहे, पर्हाटीचा कापूस पावसाने जमीनीवर गळून पडला यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. तसेच तुरीचे पीक फुलोऱ्यावर असुन या पीकाला अती पाऊस झाल्याने फुलोरा गळून पडला आहे. यामुळे तुरीचे पीक हातचे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. हे नुकसान शेतकर्यांच्या अडचणीत भर घालणारेच आहे. शासनाने चांदूरबाजार तालुक्यामधे अजूनपर्यंत नुकसानीचे पंचनामे करणे चालू झाले नाही. शासनाने राज्यातील इतर नुकसानग्रस्त भागाप्रमाणे या परिसरातही पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.














