अंजनगाव सुर्जी येथील कार्यरत शिक्षकाच्या घरावर जिल्हा उपनिबंधक पथकाची धाड

0
197

▪️अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर लगाम घालणार का? जिल्हा उपनिबंधक पथक

अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज अमरावती

अमरावती : जिल्ह्यात सावकारी करत शेतकरी व गरजू नागरिकांचा अनैतिक पद्धतीने आर्थिकदृष्टिकोनातून लुटणाऱ्या अंजनगाव सुर्जी येथे कार्यरत शिक्षकाच्या घरावर दि.२९ नोव्हेंबर रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पथकाने धाड टाकली असून जिल्हा उपनिबंधक अमरावती यांनी अवैध सावकारी विरुद्ध विशेष अभियान राबवून अमरावती शहरातील तीन ते चार अवैध सावकारांविरुद्ध कारवाई करून सावकारी पाशांचा पडदाफाश केला आहे.
अचलपूर सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयात अवैद्य सावकारी संबंधाने तक्रार प्राप्त झाली असता तक्रारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या तरतुदीनुसार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या पथकाने २९ नोव्हेंबर रोजी नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील मोहन नगर साई मंदिर अमरावती येथील रहिवासी रवींद्र भीमराव भागवत च्या घरावर धाड टाकत त्यांच्या घरातून अवैधरित्या सावकारी सामग्री यामध्ये खरेदीखत इसार पावती कोराधनादेश व इतर कच्च्या नोंदी असलेल्या मध्ये डायरी व अन्य दस्तावेज जिल्हा उपनिबंधक पथकाने जप्त केली आहे.रवींद्र भागवत हे सहाय्यक शिक्षक म्हणून अंजनगाव सुर्जी येथील प्रागतिक विद्यालयात सहायक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
सदरची कारवाही विभागीय सहनिबंधक विनायक कहाळेकर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था शंकर कुंभार सहाय्यक निबंधक स्वाती गुडधे,परेश गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात पथक प्रमुख सचिन पतंगे,सुधीर मानकर यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली असून जिल्ह्यात आणखी अशा अवैध नोंदीचा तपास जिल्हा उपनिबंधक पथक उघड करून कारवाही करणार का? याकडे शोषित शेतकरी मजूर नागरिकांचे लक्ष वेधले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here