विद्यापीठातील एससी. एसटी व इतर मागास प्रवर्गातील अनुशेष तात्काळ भरा- विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

0
77

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार शासनाकडून कार्यवाही का झाली नाही- वडेट्टीवार यांचा सवाल

नागपूर प्रतीनिधी
प्रबोधिनी न्युज

नागपूर दि. 7 :- महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने अनुशेष दूर करण्याची शिफारस केली आहे. त्या अनुषंगाने याबाबत सकारात्मक विचार करुन संबंधित विद्यापीठातील एससी. एसटी व इतर मागास प्रवर्गातील अनुशेष तात्काळ भरण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे. अहवाल सादर करुन सात महिन्याचा कालावधी उलटूनही शासनाकडून अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, असा सवाल देखील त्यांनी सरकारला केला आहे.

वडेट्टीवार म्हणाले, एकीकडे ओबीसी आरक्षणावरुन आंदोलन सुरु असताना प्रत्यक्षात नोकरीमध्ये ओबीसी किंवा इतर प्रवर्गाच्या जागा भरल्या जात नाहीत. त्यामुळे मोठा अनुशेष शिल्लक राहतो, असे दिसून आले आहे. महाराष्ट्रातील १० अक्रषी विद्यापीठांतर्गत एकूण ११७७ महविद्यालयातील ३४,४३१ पदे मंजूर आहेत. या ३४,४३१ पदापैकी १०,२१३ पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या उपसमितीकडून ५३२ महाविद्यालयापैकी ३२५ महाविद्यालयातील २०८८ मंजूर पद भरतीबाबत संबंधित विद्यापीठाच्या आरक्षण कक्षाकडून बिंदू नामावलीची प्राथमिक तपासणी प्रमाणित करुन अहवाल दिला आहे. त्यानुसार एससी. एसटी इतर सर्व मागास प्रवर्गातल्या मिळून अनेक जागा रिक्त आहेत, असा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. यावर सरकारने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग अधिनियम २००५ अन्वये महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे कामकाज चालते. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद हरिबा काळे, प्रा. डॉ. श्रीमती निलिमा सरप यांच्या उपसमिती मार्फत दिनांक ११ एप्रिल २०२२ च्या शासन आदेशानूसार विद्यापीठ परिसर,संस्था, महाविद्यालय एकक मानून १० अक्रषी विद्यापीठे १९७७ महाविद्यालयातील शिक्षक पद भरती विमुक्त जात (अ), भटक्या जमाती (ब,क,ड) विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासप्रवर्ग व आर्थिक दृष्ट्या दुर्बल या नमूद प्रवर्गातील अनुषेषाबाबत आढावा घेतला गेला. २० एप्रिल २०२३ रोजीच्या आयोगाच्या बैठकीत अहवाल सादर करण्यात आला असून अनुशेष दूर करण्याची शिफारस शासनाकडे केली आहे. तरीही सरकार कार्यवाही करीत नाही हे दुर्दैव असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here