सोनाली कोसे
तालुका प्रतिंनिधी नागभीड
एन. जी. जी. इंग्लिश स्कूल नागभिड येथे भारतीय संविधान निर्माते, बोधीसत्व, सिम्बॉल आँफ नाॅलेज, विश्वविद्वान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन हा संकल्प दिन म्हणून संपन्न झाला. यावेळी स्कुलचे प्राचार्य डार्विनकोब्रा याचे हस्ते द्विपप्रज्वलीत करून प्रतिमेला माल्यार्पण केले.
यावेळी अध्यक्षस्थानी एन. जी. जी. इंग्लिश स्कूल नागभिड चे प्राचार्य डार्विनकोब्रा सर तर प्रमुख अतिथी म्हणून कविता गोन्नाडे होते. या महापरिनिर्वाण दिनी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर प्रकाश टाकला. या प्रसंगी विद्यार्थी कसा असावा? आजच्या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी आपले उज्वल भविष्य घडविण्यासाठी बाबासाहेबांच्या जिवन संघर्ष प्रेरणादायी ठरेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये एक व्यक्ती, एक मत, एक मुल्य हा सिद्धांत दिला. तळागाळातील सर्वसामान्य माणूसाला गुलामीची जाणीव करून दिली. मानसिक गुलामगिरीतून मुक्त केले. अथक संघर्षाने महिलांना, सर्वसामान्य माणसाला मान सन्मानाने जगण्याची संधी दिली. जर भारताला आधुनिक काळात विकासाकडे जावयाचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशिवाय पर्याय नाही असे एन. जी. जी. इंग्लिश स्कूल चे प्राचार्य डार्विनकोब्रा यानी भाषणात बोलताना म्हटले.
महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून स्कुल मध्ये चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत बरेच विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे संचालन ठेंगरी यांनी केले तर आभार मंगला शेंडे यांनी केले. कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी पुजा पांडव, निषा मेश्राम, रविना भरडकर यांनी सहकार्य केले.

