अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना तातडीने सरसकट नुकसान भरपाई द्यावी

0
77

मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांना आम आदमी पार्टीचे पत्र

अश्विनी कोटमे
जिल्हा प्रतिनिधी
नाशिक

नाशिक- आज दि. 06.12.2023 अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी आपंच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला, जवळपास सर्वच पिकांचे खूप मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे, काही शेतकरी तर आमच्या जवळ ढसाढसा रडलेत, कारण त्यांची पूर्ण वर्षाची कमाई अवकाळी पावसामुळे पाण्यात गेली आहे, काहींनी सांगितले की बँकेचे कर्ज आता कसे फेडू, आम्हाला आता आत्महत्या करण्यापलीकडे काहीही पर्याय नाही, काहींनी सांगितले की आमच्या मुलीचे लग्न कसे करू, काहींनी सांगितले की आमच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी कसे पाठवू असे बोलून दाखविले आहे.

नविंदर अहलुवालिया:- एकनाथ शिंदे जी, आपण राज्याचे प्रमुख आहात या नात्याने आपल्या राज्यातील ह्या नैसर्गिक अवकृपेमुळे ओढवलेल्या परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांचे परिवार उध्वस्त झाले आहेत त्यांना सावरण्याची जबाबदारी आपली आणि कृषिमंत्री धंनजय मुंडे यांची आहे. त्यामुळें आपण जबाबदारी ओळखुन तात्काळ मदत पोहोचवावी जेणेकरून शेतकरी पुढील पिकांच्या पेरणीची तयारी करतील.

चंदन पवार:- एकनाथ शिंदे आपण स्वतः शेतकरी आहात त्यामुळे शेतकऱ्यांचे दुःख आपल्याला चांगल्याप्रकारे समजू शकते, हाच धागा पकडून शेतकऱ्यांची परिस्थितीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी आम आदमी पार्टी आपल्याकडे महत्वाच्या मागण्या करीत आहे कृपया आपण त्या पूर्ण कराल याची खात्री आहे,अजूनही शेतकरी मदतीपासून वंचित आहेत याकडे आपण लक्ष केंद्रित कराल ही विनंती.

मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांच्याकडे आप च्या मागण्या

1. पंचनामा करण्यात वेळ न घालविता, तात्काळ सरसकट मदत करण्याची आवश्यकता आहे.

2. सरसकट मदत फक्त कागदावरच वर्षानुवर्ष न राहता प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सरकारने करावी.

3. पीडित शेतकऱ्यांपर्यंत सरकारी मदत वेळेवर पोहोचली की नाही याची खातरजमा करण्यासाठी सरकारने एक समिती नेमावी.

4. शेतकऱ्यांकडून सहा महिन्यापर्यन्त राष्ट्रीय बँक, जिल्हा बँक, फायनान्स कंपन्या व पतसंस्था इत्यादी बँकांना कर्ज वसुली करू नये यासाठी आदेश काढावेत.

5. विमा कंपन्यांना आदेशीत करून शेतकऱ्याना तात्काळ पीक विमा द्यावा यासाठी आदेश काढावा.

यासंबंधीचे मागणी पत्र नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यामार्फत देण्यात आले आहे.

ह्यावेळी राज्य संघटन मंत्री नविंदर अहलुवालिया, राज्य मिडिया प्रमुख चंदन पवार, नासिकचे पदाधिकारी गिरीश उगले पाटील, स्वप्निल घिया, अमित यादव, दिपक सरोदे, अनिल फोकने, प्रविण पगारे, एकनाथ सावळे ईत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here