prabodhini news logo
Home ठळक बातम्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संविधान पत्रक वाटप, अन्नदान वाटप...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संविधान पत्रक वाटप, अन्नदान वाटप किंवा गोशाळेला पेंड किंवा कडबा वाटप करून अभिवादन करा – असे प्रतिपादन गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर

0
53

परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

परभणी – आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे राष्ट्रजन फाउंडेशन परभणी च्या वतीने ज्ञानाच्या अथांग महासागरास महामानव, परम पूज्य, बोधिसत्व, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन पूजन करण्यात आले याप्रसंगी समाजसेवक सुनील कोकरे, डि. एस. खरात आधी मान्यवर उपासक अभिवादनसंयोजक राष्ट्र जन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी प्रास्ताविक बोलताना कोणत्याही महापुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी करताना गोशाळेत किंवा सरकारी हॉस्पिटल गोरगरिबांना मदत करून आर्थिक व अन्नदान वाटप करून साजरी करा हीच खरी महापुरुषांच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी हेच खरे अभिवादन होय.
दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे अभिवादन पूजन करण्यात आले. अशी माहिती बहुजन समाजसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here