
सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक 6 डिसेंबर 2023 ला इंडियन रेड क्रॉस सोसायटी व टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक मेन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ कॅन्सर रोग निदान शिबिर व मधुमेह बीपी तपासणी शिबिर घेण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री विनय गौडा अध्यक्ष इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांच्या हस्ते व रविंद्र परदेशी पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी 180 च्या वर नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रमास प्रामुख्याने इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे डॉ. बी एच दाबेरे, डॉ. संजय घाठे,डॉ दुधीवर, व्हि डी मेश्राम, सीए शादाब चिनी टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन तर्फे डॉ.आशिष भारंबे, डॉ. ट्विंकल डेंगळे तसेच रेड क्रॉस चे प्रोजेक्ट कॉर्डिनेटर डॉ पियुष मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन इंडियन रेड क्रॉस सोसायटी व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर चे नर्सिंग स्टाफ व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.














