prabodhini news logo
Home अमरावती मुख्यालयी न राहता घरभाडे भत्ता घेणार्‍याची अधिक्षक अभियंत्या कडुन पाठराखन

मुख्यालयी न राहता घरभाडे भत्ता घेणार्‍याची अधिक्षक अभियंत्या कडुन पाठराखन

0
147

अभिप्राय दिला नसल्याने दक्षता विभागाचा अहवाल रखडला

अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज अमरावती

अमरावती – (चांदुर बाजार) मुख्यालयी न राहता कागदोपत्री भाड्याने राहून शासनाकडुन घरभाडे भत्ता वसुली प्रकरणात चांदूर बाजार येथील विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ मध्यम व प्रकल्प उपविभागीय अभियंता प्र.र.पालवे यांचे विरोधातील तक्रारीचे प्रकरणाची दखल आता विदर्भ पाटबंधारे विभागाच्या संचालकांनी घेतली असून आज पर्यंत झालेल्या पालवे यांच्या सर्वस्तरावरील पुनरचौकशी चौकशी करुन अहवाल परिमंडळ अधिकारी तथा अधिक्षक अभियंता व दक्षता पथकाकडे सादर करण्याचे आदेश पाटबंधारे विभागाचे मुख्यअभियंता यांना दिले होते.परंतु अधिक्षक अभियंत्याने अभिप्राय न दिल्याने दक्षता पथकाचा अहवाल रखडला आहे.या प्रकरणाची तक्रार अ.भा.ग्रा.पत्रकार संघाचे प्रसिध्दीप्रमुख सागर सवळे यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री ,मुख्यसचिव जलसंपदा विभाग मुंबई,कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर,मुख्यअभियंता जलसंपदा विभाग अमरावती यांना दि.१४ जून २०२३
रोजी तक्रार केली होती.
प्रादेशिक कार्यालयाने त्रयस्थ कार्यालय मार्फत चौकशी करण्याबाबत प्रादेशिक स्तरावर निर्णय घेतला होता त्यानुसार चौकशी अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आली होती.मुख्यअभियंता जलसंपदा विभाग अमरावती यांचे पत्रा अन्वये श्रीकांत व्ही मस्कावार कार्यकारी अभियंता बेंबळा पाटबंधारे विभाग यवतमाळ यांची विषयांकीत प्रकरणी त्रयस्त विभागाचे कार्यकारी अभियंता,म्हणून चौकशी करण्याकरिता चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती.त्यांनी सदर प्रकरणाची स्थळ पाहणी न करता तसेच प्रत्यक्ष घटनास्थळी भेट न देता चौकशी अहवाल व खोटी तारीख टाकून भेट दिल्याची माहिती दिली.प्र.र.पालवे हे वास्तव्याचे ठिकाणी आढळले ही दिशाभुल करणारी चुकीची माहिती दिली.घरमालक हे त्याच कार्यालयातील सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक या पदावरून सेवानिवृत्त झाले यांची प्रत्यक्षात भेट घेवून प्पालवे उपविभागीय अभियंता किती वर्षापासून वास्तव्यास आहे.लेखी स्वरूपात लिहून घेतले हि माहिती श्रीकांत व्ही. मस्कावार यांनी खोटी व चुकीची दिली.घरमालक हा त्याच कार्यालयातील निवृत्त कर्मचारी असल्याने त्यांनीही खोटी माहिती दिली.थातुरमातुर पंचनामा केल्याचे दाखविले. उपविभागीय अभियंता पालवे यांनीही दिशाभुल करणारी माहीती दिली. या चुकीच्या व दिशाभुल करणार्‍या माहीतीच्या आधारे बेंबळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीकांत.मस्कावार यांनी चौकशी अहवाल सादर केला.त्यात
पालवे मुख्यालयी राहत असल्याचे नमुद करुन मुख्यालयी उपस्थित राहत नसल्यामुळे त्यांना मिळणारा घरभाडे भत्ता बंद करण्याबाबत केलेल्या तक्रारीत काही तथ्थ आढळले नसल्याचा खोटा अहवाल दिला. प्रत्यक्षात सदर चौकशी अहवाल मस्कावार यांनी कार्यकारी अभियंता सुरेंद्र आडे व प्र.र.पालवे यांचे कडूनपरभारे विचार पुस करून व घरमालक हे याच विभागातील सेवा निवृत्त कर्मचारी असल्याने त्याचे कडून सदर वास्तव्यास ठिकाणचा पंचनामा पालवे व आडे यांनीच पंचनामा केला व तो मस्कावार यांना पुरविण्यात आला. प्रत्यक्षात मात्र मस्कावार यांनी चौकशी अहवालात दिलेली माहिती कार्यकारी अभियंता सुरेंद्र आडे व प्र.र.पालवे यांचे कडून घेतली व खोट्या माहीतीचा चौकशी अहवाल मस्कावार यांनी मुख्यअभियंता जलसंपदा विभाग अमरावती यांना दिला.
तक्रारकर्त्यांनी चांदूर बाजार विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालयात चौकशी केली असता दि. ११ एप्रील २०२३ ला कोणताही अधिकारी चौकशीसाठी आलेच नाही..तसेच तेथील कार्यालयातील भेट नोंद वहीत (व्हीजीट बुक) अशी नोंद नाही.यावरुन श्रीकांत मस्कावार यांनी दिलेला चौकशी अहवाल यांनी खोटा व चुकीचा दिशाभुल करणारा असल्याचे दिसते. सदर चौकशी अधिकार्‍याने चांदूर बाजार कार्यालयाला भेट न देता परस्पर यवतमाळ कार्यालयातून अहवाल दिल्याचे दिसते.पालवे भाड्याने राहत असलेल्या घराची ही कोणती ही चौकशी केली नाही असे निष्पन्न होते.घरी बसल्या सदर अहवाल दिल्याचे निर्देशनात येते.
मुख्यालयी न राहता कागदोपत्री घरभाड्याने दाखवून शासनाची लुट करणार्‍या अधिकार्‍या विरूध्द अनेक तक्रारी करून ही जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी या तक्रारीला केराची टोपली दाखवून उपविभागीय अभियंता प्र.र.पालवे यांना अभय देत असल्याचा आरोप तक्रारकर्ते सवळे यांनी केला असून महाराष्ट्र शासन निर्णय ९सप्टेंबर २०१९ नुसार पालवे यांनी वसुल केलेला घर भाडे भत्ता त्यांच्या पगारातुन वसुल करून सदर प्रकरणातील सर्व दोषी अधिकार्‍यावर कारवाई करावी.अशी मागणी केली आहे.या प्रकरणावर वेळीच कारवाई झाली नाही तर न्यायालयात दाद मागणार असल्याचे कार्यकारी संचालक पाटबंधारे विभाग यांना दिलेल्या तक्रारीत सागर सवळे यांनी नमुद केले आहे
ग्रापंचायत,पोलीस स्टेशन,गॅस एजन्सी,विज वितरण यांनी दिलेल्या पत्रानुसार पालवे या ठिकाणी राहत नसल्याचे सबळ पुरावे तक्रारकर्त्यांनी स्दर केल्यानंतरही यवतमाळ कार्यकारी अभियंता बेंबळा प्रकल्पाचे मस्कावार यांनी दिलेला चौकशी अहवाल बनावट असल्याचे स्पष्ट होते.
कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांनी मुख्यअभियंता जलसंपदा विभाग अमरावती यांना आदेश देवून सदर विषयांकित प्रकरणाचे संपुर्ण कागदपत्र व दस्ताऐवज अधिक्षक अभियंता तथा परीमंडळीय अधिकारी,दक्षता पथक अमरावती परीमंडळ जलसंपदा विभाग अमरावती यांचे कडे सोपविण्याचा यावे असा आदेश दिला होता.
अधिक्षक अभियंता व परीमंडळीय अधिकारी दक्षता पथक अमरावती परीमंडळ जलसंपदा विभाग यांचे कडे संपुर्ण कागद पत्र सादर केली.तसेच दक्षता पथकाने तक्रारदार यांच्या कडून ही कागद पत्र मागीतली तक्रारदाराने संपुर्ण कागदपत्र दिली .तरी तीन महिन्यापासून दक्षता पथकाने कोणता ही चौकशी अहवाल दिला नाही.दक्षता पथकाचे श्रीकांत हेडाऊ यांना विचारना केली असता दक्षता पथकाने चौकशी अहवाल तयार केला. मनिष राजभोज अधिक्षक अभियंता उर्ध्व वर्धा सिंचन मंडळ अमरावती यांनी आपला अभिप्राय दिला नाही त्यामुळे सदर अहवाल पुर्ण केल्या जात नाही अशी माहिती दिली.
मनिष राजभोज अधिक्षक अभियंता उर्ध्व वर्धा सिंचन मंडळ अमरावती हे अभिप्राय देण्यास टाळाटाळ करत आहे.यावरून अधिक्षक अभियंता राजभोज यांचे उपविभाग अभियंता प्र.र. पालवे यांना पाठबळ असल्याचे दिसते. सदर प्रकरणात आता राजेश सोनटक्के कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर अधिक्षक अभियंता उर्ध्व वर्धा सिंचन मंडळ मनिष राजभोज वर काय कारवाई करतात ? याकडे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here