सुनील दरेकर
श्रीगोंदा शहर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
श्रीगोंदा तहसील कार्यालय समोर बेमुदत साखळी उपोषणाला आज सोमवार दि. 4/12/2023 रोजी सकाळी 11 वाजता सुरू केलेल्या साखळी उपोषणाला आज सोमवारी दिनांक 11/12/2023 पर्यंत उपोषण सुरूच आहे तालुक्यातील प्रत्येक गावातील सकल मराठा बांधव यात यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आहेत व आरक्षणाबाबत सरकार योग्य निर्णय घेत नाही तोपर्यंत साखळी उपोषण चालू राहील अशा भावना उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहेत जोपर्यंत झोपलेल्या सरकारला जाग येत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण असेच चालणार आहे. श्रीगोंदा तालुक्यातील प्रत्येक गावातील सकल मराठा समाजाचे सर्वसामान्य नागरिक हे उपोषणास बसणार आहे अशी माहिती उपोषणकर्त्यांनी दिली आहे.

