राष्ट्रीय मानव अधिकार दिनानिमित्त महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष सुवर्णा कदम यांनी महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर आणि मोफत औषधे वाटप चे आयोजन

0
120

निशा सोनवणे
कोकण विभाग संपादक
प्रबोधिनी न्युज

ठाणे- आज राष्ट्रीय मानवाधिकार दिवसाच्या निमित्ताने युनिव्हर्सल ह्युमन राइट्स कौन्सिल भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तरुण बाकोलिया तसेच राष्ट्रीय महिला अध्यक्ष सुमन मोरया यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष सुवर्णा कदम यांनी दिव्यामध्ये महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते या आरोग्य शिबिरामध्ये महिलांच्या रक्तातील HB चे प्रमाण तसेच विटामिन B12 विटामिन D3 चेक अप आयोजित केले होते या आरोग्य शिबिरामध्ये महिलांचे चेकअप करून त्यांचे ऑनलाईन रिपोर्ट देण्यात आले आणि या सर्व महिलांना मोफत औषध उपचार सुद्धा करण्यात येत आहेत.


या शिबिराच्या माध्यमातून जवळजवळ 90 महिलांना या शिबिराचा लाभ घेता आला त्याबद्दल युनिव्हर्सल ह्युमन राइट्स कौन्सिल भारत आणि सुवर्णा कदम यांचे सर्वांनी आभार व्यक्त केले तसेच या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त केक कापून खूप छान पद्धतीने सुरुवात केली या कार्यक्रमास आरंभ सोशल फाउंडेशनच्या शिक्षिका ज्योती नारंगीकर, नंदा कोळी, गीताली कोळी, वैष्णवी कदम, आर्यन कदम जेसीका थोरात तसेच सर्व नर्सिंगच्या स्टुडंट्स उपस्थित होत्या त्याचबरोबर सर्वांनी खूप छान पद्धतीने सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद या कार्यक्रमास लोकभारतीच्या माध्यमातून विनोद कुमार सिंग आणि त्यांची टीम उपस्थित होती त्याचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here