बंगाली कॅम्प चौकात ट्राफिक सिग्नलमुळे मूल व बल्लारपूर जाणाऱ्या वाहनधारकास होतो त्रास

0
86

चंद्रपूर प्रतिनीधी
प्रबोधिनी न्युज

चंद्रपूर येथील बंगाली कॅम्प चौकात ट्राफिक सिग्नल असून या ट्राफिक सिग्नलमुळे मूल व बल्लारपूर जाणाऱ्या वाहनधारकास खूप त्रास सहन करावा लागत आहे हे सिग्नल मूल व बल्लारपूरकडे जाणाऱ्या वाहनांना पार पडत नाही याचा आर्थिक दंड हा वाहनधारकांना बसत आहे याची गंभीर दखल वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी मागणी राजू झोडे यांनी केली आहे.
चंद्रपूर येथील बंगाली कॅम्प चौकात असलेले ट्राफिक सिग्नल हे 20 सेकंदाचे असून त्यामुळे मूल व बल्लारपूर जाणाऱ्या वाहन पूर्णतः सिगनल पार करू शकत नाही. ते 40 सेकंदाचे करावे 20 सेकंदाचे असल्याने याचाच फायदा नेमका वाहतूक पोलीस घेतात आर्थिक दंड लावतात याची गंभीर दखल वाहतूक अधिकाऱ्याने घ्यावी अशी मागणी राजू झोडे यांनी केली आहे.
सदर मागणीचे निवेदन वाहतूक अधिकाऱ्यास आज दुपारी चार वाजता देण्यात आले. निवेदन राजु झोडे, रमेश पिटल्यवार, श्याम झिलपे, राहुल गायकवाड़ आदि लोकानी ट्राफिक पुलिस अधिकारी यांना निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here