सुनिल दरेकर
श्रीगोंदा शहर प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने श्रीगोंदा तहसिलसमोर तब्बल पंधरा दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. रोज तालुक्यातून एक -दोन गावे सहभागी होत आहेत.आज १५ व्या दिवशी कोळगाव /पेडगाव तसेच पिंप्री कोलंदर या तीन गावांमधील मराठा बांधव साखळी उपोषणासाठी तहसिल समोर मोठ्या प्रमाणात आले होते.यावेळी शिवभक्त बाळासाहेब महाराज धोत्रे,आरती रणसिंग, हरिदास शिर्के,अमित लगड,ऋषी लगड, सुदाम कुटे, मारुती सुंबे यांनी मराठा आरक्षणावर भावना व्यक्त केल्या.
या साखळी उपोषणासाठी कोळगाव येथील विलास शितोळे, संकेत नलगे,शुभम जगताप,अमर लगड,संदिप लगड, दादासाहेब लगड,आनंद लगड,सचिन डुबल..पिंप्री कोलंदरचे गणेश बोबडे,एकनाथ पवार,मनोहर शिंदे,सुनिता धोत्रे. पेडगाव येथील गणेश झिटे,भगवान कणसे,प्रतिभा झिटे, सुनिल कदम, जालिंदर खेडकर यांसह रामदास झेंडे, सोनाली शिंदे, माया खेंडके,प्रशांत जाधव,लक्ष्मण वनपूरे आदी उपस्थित होते.
या पंधरा दिवसांमधे शेकडो मराठा बांधवांनी साखळी उपोषणासाठी सहभाग नोंदविला आहे असे भारती इंगावले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

