स्थानिक बेरोजगारांना, कंपन्या कामावर घेईना
स्वप्निल मोहितकर
तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज भद्रावती
भद्रावती(माजरी) :-राज्य शासनाच्या नियमानुसार कोणत्याही स्थानिक प्रक्लपात प्रक्लपग्रस्त, स्थानिक भूमिपुत्रांना जवळपास ८० टक्के रोजगार दिला जावा असा नियम असताना सुद्धा
माजरी परिसरातील प्रकलपग्रस्त, व भूमिपुत्रांना रोजगारात दोन किंवा तीन टक्के सुद्धा स्थान नाही
माजरी येथील स्थानिक क्षेत्र हे वे.को.ली. वसाहतीमुळे
नावाजलेले आहे तसेच वे.को.ली.शी स्वलग्न असलेल्या अनेक कंपन्या येथील परिसरात कार्यरत आहेत दरम्यान माजरी परिसरातील स्थानिक असलेल्या अनेक कोळसा खाणीतून कोटी रुपयांच कोळसा उत्पादन एका दिवसाला होत असते ,येथील कोळसा हा गुणवत्तेत ग्रेड 8 व 9असल्याने व विद्युत निर्मितसाठी लाभदायक असल्याने कोणत्याही पॉवर हाऊस ला येथील कोळशाची खूप मोठ्या प्रमाणावर मागणी असते ,कारण माजरी येथील कोळसा वीज निर्मितीसाठी उत्कृष्ठ आहे.मात्र कोळसा खाणीतून कोळसा काढण्यासाठी वे.को.ली.ही स्वतः खोदकाम करत नाहीत ते कंत्राट खाजगी कंपन्यांना दिले जाते. त्यामुळे वे.को.ली.शी संलग्न असलेल्या अनेक खाजगी कंपन्या माजरी परिसरात मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत मात्र या कंपन्यामधे सद्यपरिस्थितीत परप्रांतीय मजुरांची भरती मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या कंपन्यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या व प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना ८० टक्के रोजगार न देता परराज्यातील मजुरांना रोजगार दिला त्यामधे या कंपन्यांनी डायरेक्ट भरती प्रक्रिया राबवली आहे, भरती करताना त्यांच्याकडून पोलिस व्हेरिफकेशन मागितले नसून ना त्यांची राज्य सीमा व खाणीमधील कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण न घेतलेल्या परराज्यातील युवकांना समाविष्ट करण्यात आले आहे,त्यांना सरळ भरती प्रक्रिया राबवली असून स्थानिक बेरोजगारांना एक्सप्रिअन्स सर्टीफिकेची मागणी करण्यात आली आहे.मात्र बाहेरून आलेल्या कामगारांना या बद्दल काहीही पुरावा न मागता कामावर समाविष्ट करण्यात आले आहे.
वे.को.ली.मधे कार्यरत असलेल्या वे.को.ली. कर्मचारी हे आपले जीव मुठीत घेवून काम करत असतात ,त्यांना त्यांच्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी हा धोका पत्करावा लागतो ,कोळसा उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी ब्लास्टिग मुळे परिसरातील घरे कोसळून घरांना भेगा पडून घरे कोसळण्याच्या स्थितीत पहावयास मिळताहेत परिसरातील दूषित पाण्यामुळे व वातावरणामुळे त्यांनी दमा, खोकला, क्षयरोग,अनेक प्रकारच्या आजारांचे सामने त्यांनी केले असून आपली जीवनाची बहुमूल्य वर्ष वे.को.ली. प्रकल्पाला दिली आहेत काहींनी तर या दुर्धर आजारामुळे आपला जीव पण गमावला आहे.
मात्र एवढे हालअपेष्टा भोगुनही या वें.को.ली.कर्मचाऱ्याच्या व प्रकल्पग्रस्ताच्या मुलांना रोजगारासाठी वणवण फिरावे लागते परंतु या कंपन्या परराज्यातील मजूर भरती करवून मनमानी करीत असल्याचे दिसून येते आहे.त्यांनी सरळ राज्य शासनाच्या नियमाला पायदळी तुडवले आहे. या बाहेरून आलेल्या कंपन्या महाराष्ट्रीय मुलांना कामावर घेत नसून स्थानिक वेकोली कर्मचाऱ्यांच्या मुलांना कामावर रुजू करून घ्यायला तयारच नाहीत ! ही मोठी दुर्दैवी बाब आहे.
भूमिपुत्र,प्रकल्ग्रस्त मुले बेरोजगार हिंडतात मात्र वे.को.ली.शी संलग्न असलेल्या कंपन्यामधे स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार न देता ह्या कंपन्यांनी परप्रांतीय मजुरांची भरती प्रक्रिया अजूनही सुरू आहे. त्यांना स्थानिक बेरोजगारांच्या समस्या अजूनही लक्षात येत नाहीत .या बाबतीत अनेकदा तरुणभारत या वृत्तपत्रात वृत्त प्रकाशित सुद्धा झाले आहेत.मात्र
माजरी परिसरातील स्थानिक बेरोजगारांच्या समस्यावर तोडगा निघाला नाही तर या बाबतीत कोणत्याही नेत्यांचा सहारा न घेता येथील स्थानिक बेरोजगार तरुण व प्रकल्पग्रस्त महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री शिंदे यांना लेखी निवेदनाद्वारे तसेच भ्रमणध्वनी, वरून सूचना देवून त्यांना माजरी परिसरातील ग्राउंड लेव्हल ची माहिती सादर करणार आहेत.तसेच कामगार मंत्री यांना सुद्धा निवेदनाद्वारे कळविण्यात येणार असल्याचे स्थानिक परिसरातील बेरोजगारांच्या संघटनेने माहिती सादर केली आहे.

