केंद्र शासनाने जाहीर केलेला हमीभाव अत्यंत तोडका असल्याने राज्य सरकारने शेतकऱ्यांना बोनस द्यावा – डॉ. नामदेव किरसान

0
49

गोंदिया प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

गडचिरोली- दि. १७/१२/२०२३ रोजी मौजा बोदलबोडी ता. सालेकसा जि. गोंदिया येथे नवयुक नाट्य कला मंडळ बोदलबोडी (गोविंदपुर) यांच्या वतीने “कसाई” या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमुर लोकसभा समन्व्यक डॉ. नामदेव किरसान यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणात महागाईमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झालेली आहे परंतु केंद्र शासनाने जाहीर केलेला धानाचा हमीभाव उत्पादन खर्च भरून निघण्यालायक नाही, करिता महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना बोनस द्यावा अशी मागणी काँग्रेस पक्षामार्फत नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात उचलून धरण्याची विनंती माननीय विरोधी पक्षनेते आमदार विजय भाऊ वडेट्टीवार यांच्याकडे करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा झालेली असून ते सोमवारीच अधिवेशनाचे कामकाज सुरु होताच बोलाची मागणी करणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत भाजप प्रणित सरकार उदासी नसून जनसामान्यांच्या समस्याकडे लक्ष देत नाही. तरीपण बोलत ची मागणी सतत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सुनील हत्तीमारे, महेश हत्तीमारे, मोतीलाल हरींनखेडे, महेन्द्र बहेकार, पन्नालाल पटले, धनराज शाहरे, राकेश हत्तीमारे, अनिल हत्तीमारे व मोठ्या संख्येने प्रेसक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here