सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज
आजच्या धकाधकीच्या जीवनात वृद्ध हे एकांत पडले आहे त्यांच्याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नसतो अशातच या तिन्ही क्लब माध्यमातून इंनरव्हील चां सुत्य उपक्रम बल्लारपुर रोड वरील स्थित मातोश्री वृद्धाश्रम मधील 40 वृध्दांना भद्रावती येथील जैन मंदिराचे दर्शन घडविले. चंद्रपूर मधील तिन्ही इंनर व्हील चंद्रपूर क्लब, चांदाफोर्ट क्लब आणि चांदाफोर्ट अँजेल क्लब मिळून संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. 6 डिसेंबर ला सकाळी सगळ्या वृध्दांना बस नी भद्रावती येथे जैन मंदिरात नेण्यात आले…चंद्रपूर क्लब च्या अध्यक्षा राखी बोराडे आणि प्रकल्प निर्देशक अनुष्का बच्चुवार यांनी बस मधे त्याच्या सोबत भजन आणि गाण्याच्या भेंड्या घेतल्या. स्वाती बेत्तावार यांनी वृद्धांसाठी गमतीदार प्रश्नमंजुषा आयोजित केली होती, चांदा फोर्ट अँजेलस च्या अध्यक्षा कल्याणी कंचार्लावार यांनी वृद्धांसाठी नाष्टा ची सोय केली होती. भद्रावती ला पोचल्यावर तिन्ही क्लब च्या सदस्यांनी मिळून सगळ्या वृध्दांना मंदिरात प्रवेश करवून दर्शन करवून दिले. त्यानंतर त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली… जैन मंदिर व्यवस्थापक समितीनी यासाठी सहकार्य केले. चांदा फोर्ट क्लब च्या अध्यक्षा Dr. राधिका झुल्लूरवार यांनी त्यांच्या सासूबाई क्षमा विलास झुल्लुरवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सगळ्यांसाठी महाप्रसाद ची सोय केली होती. त्यानंतर वृध्दांना गमतीशीर गेम्स खेळायला लावले. यावेळी सगळ्या वृध्दांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्या सारखा होता. विजयी ठरलेल्या ना बक्षीस देण्यात आले… सगळ्या वृध्दांना थंडीपासून बचाव करण्यासाठी पायमोजे वाटप करण्यात आले, आणि चहापान झाल्यावर सगळ्यांना वृद्धाश्रमात पोहचते करण्यात आले. यावेळी तिन्ही क्लब चे पदाधिकारी उपस्थित होते .धकाधकीच्या जीवनात काही आनंदाचे क्षण वृध्दांना सोबत व्यतीत केले ,याचा आनंद परतीच्या प्रवासात सगळ्या इंनर व्हील सदस्याच्या चेहऱ्यावर झळकत होता

