रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज
ब्रम्हपूरी तालुक्यातील मालडोंगरी येथील सुरेश शालिकराम पारधी वय 50 वर्ष यांना हृदयविकार असल्याने त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरु आहे. मात्र घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना वैद्यकीय उपचार घेतांना आर्थिक अडचण निर्माण झाली होती.
सदरची बाब मालडोंगरी येथील ग्राम काॅंग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे विरोधीपक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांना कळवताच त्यांनी सदर रुग्णाला वैद्यकीय उपचार घेतांना आर्थिक हातभार लागावा म्हणून आपल्या स्वतः कडून आर्थिक मदत पाठवली आहे.
सदरची आर्थिक मदत देतांना माजी जि. प. सदस्या स्मिता राजेश पारधी, मा. राजेश पारधी माजी सरपंच मालडोंगरी तथा कोषाध्यक्ष ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमेटी, मा. तुळशीदास राऊत सचिव काँग्रेस कमेटी मालडोंगरी, मा. धर्मेंद्र राऊत सोशल मीडिया प्रमुख मालडोंगरी, धनश्री सिडाम ग्रा. प. सदस्या, मा. आकाश बरडे मा. फ्रफुल पारधी अध्यक्ष गुरुदेव सेवा मंदिर मालडोंगरी श्रीमती संगीता पिलारे, कविता मेश्राम, मा. नानाजी पारधी, मा. दादाजी सहारे, मा. श्रीकृष्ण बगमारे, मंगेश पारधी, हरिश्चंद्र सोनवाने शामराव बावणे इत्यादी मंडळी उपस्थित होते.

