
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – संस्कार भारती चंद्रपूर तर्फे गतवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा बालकांसाठी रेषारंग या चित्रकला विषयक कार्यशाळेचे आयोजन प्रत्येक रविवारी सकाळी 7.30 ते 9.30 वाजता दरम्यान आझाद बगीचा चंद्रपूर येथे करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सर्व बालकांसाठी नि: शुल्क आहे. संस्कार भारतीचे चित्रकला विधा प्रमुख व प्रसिद्ध चित्रकला शिक्षक किरण पराते आणि रांगोळी विधा प्रमुख व प्रसिद्ध रांगोळीकार सुहास दुधलकर हे या कार्यशाळेत बालकांना चित्रकलेचे धडे देत आहे. ही कार्यशाळा उन्हाळी सुट्यामध्ये घेण्यात येत आहे. गेल्या वर्षी प्रमाणेच यावर्षी सुद्धा बालकांचा उदंड प्रतिसाद या कार्यशाळेला लाभत आहे.
चंद्रपूरातील बालकांनी या रेषारंग कार्यशाळेचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन संस्कार भारती चंद्रपूर तर्फे करण्यात आले आहे.















