prabodhini news logo
Home ठळक बातम्या वंचित बहुजन माथाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पुणे शहर च्या वतीने...

वंचित बहुजन माथाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पुणे शहर च्या वतीने पद नियुक्ती व भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त बैठक

0
102

पुणे जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

पुणे – आज दिनांक २८ डिसेंबर २०२३ रोजी शासकीय विश्रामगृह (IB) येथे ३१ डिसेंबर २०२३ रोजी भिमा कोरेगाव शौर्य दिना निमित्त आदरणीय युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या भव्य बाईक रॅली संदर्भात वंचित बहुजन माथाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पुणे शहराची बैठक पार पडली, या वेळी बाईक रॅली मध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी होण्यासाठीचे नियोजन व चर्चा करण्यात आली, तसेच काही नवीन कार्यकर्त्यांचे प्रवेश आणि पद नियुक्ती आणि संघटना बांधणी साठी योगदान देणाऱ्या पदाधिकऱ्यांची पदबढती करण्यात आली, यावेळी वंचित बहुजन माथाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पुणे शहर आणि वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर कार्यकारणी मधील सन्माननीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here