गतिरोधक स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी
बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज लातूर
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील एकमेव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रस्त्यावर एकमेव असून या शाळेसमोरुन लातूर रेणापूर उदगीर राज्य महामार्ग असल्याने वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोडटच असल्याने शालेय विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना व शाळेत येताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
डिगोळ येथे एकच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे हि शाळा राज्य महामार्गावर या शाळेत इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत चे वर्ग चालतात विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेतात परंतु या शाळेसमोरुन वहाणांची वर्दळ वाढली असून या शाळेसमोरील रस्त्यावर स्पीड ब्रेकर गतिरोधक नसल्याने विद्यार्थ्यांना जिव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे स्पीड ब्रेकर गतिरोधक नसल्याने लहान मोठी वाहने सुसाट धावत आहेत अपघात वाढत आहेत याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पालक वर्ग विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीना शाळेतून काढून उदगीर चामरगा नळेगाव येथील शाळेत प्रवेश देत आहेत. चार वर्षाच्या तुलनेत या शाळेत विद्यार्थी संख्या कमी झाली आहे.
टिप- ईश्वर बिरादार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिगोळ
शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत येताना व शाळेतून जाताना शाळेसमोरुन राज्य मार्ग असल्याने पहिली ते आठवीच्या लहान मोठ्या 280 विद्यार्थ्यांना जिव मुठीत धरून रस्ता ओलांढावा लागतो.याकरिता प्रशासनाने लक्ष घालून शाळेसमोर स्पीड ब्रेकर गतिरोधक बसवावे स्पीड ब्रेकर गतिरोधक नसल्याने वहाने सुसाट धावत आहेत वेळोवेळी अपघात होत आहेत.
टिप- अध्यक्ष प्रमोद बिरादार शालेय व्यवस्थापन समिती डिगोळ
शाळेसमोर स्पीड ब्रेकर गतिरोधक बसविण्याची अनेक वेळा विनंती केली असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.शाळा सुटल्यावर व भरतेवेळी शाळेतील शिक्षकांना सुरक्षारक्षका सारखे थांबावे लागते व विद्यार्थ्यांना राज्य महामार्गावर ओलांडून सोडावे लागत आहे याकरिता प्रशासनाने लक्ष घालून शाळेसमोर दोन्ही ठिकाणी स्पीड ब्रेकर गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे.
या शाळेतून शिक्षण घेवून विविध कार्यक्षेत्रात व क्लास टु वन पदांवर विद्यार्थी आहेत झळकत आहेत. आठवीच्या पुढील वर्ग नसल्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी उदगीर नळेगाव चामरगा लातूर या ठिकाणी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना बाहेर गावी जावे लागते.तर गावात विद्यालय महाविद्यालय नसल्याने मुलीच्या शिक्षणावर पाणी फिरले आहे मुलीची संख्या शिक्षणापासून वंचितच रहात आहे
या शाळेसमोरील राज्य महामार्गावर स्पीड ब्रेकर गतिरोधक बसवावे अशी विद्यार्थी विद्यार्थिनी पालकातून मागणी होत आहे.

