सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी चे राष्ट्रीय अध्यक्ष मालिकाअर्जुन खर्गे, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी सह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, काँग्रेस शासित राज्यातील मुख्यमंत्री, देशातील काँग्रेसचे सर्व प्रदेशाध्यक्ष, नेते, पदाधिकारी आणि लाखोच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते या सभेस उपस्थित होते.
वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी आणि हुकूमशाही सरकारच्या विरोधात लढादेण्यासाठी, काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यामध्ये नवी स्फूर्ती निर्माण करणारी ही सभा होती.
या सभेत गडचिरोली जिल्ह्यातूनही हजारोच्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काँग्रेस विचारधारेवर प्रेम करणारे नागरिक सहभागी झाले होते.

