
सोलापूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
सोलापूर- युवा भिम सेना सामाजिक संघटना सोलापूर चा ०६ वा वर्धापनदिनानिमित्त सामाजिक क्षेत्रात कार्य करत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना सामाजिक कार्यकर्ता या पुरस्काराने सन्मानीत करून समाजात कार्यकरणाऱ्या कार्यकर्त्यांची दखल युवा भिम सेना सामाजिक संघटनचे संस्थापक अध्यक्ष महेश आण्णा डोलारे यांनी घेतली यावेळी भिम आर्मी भारत एकता मिशन चे महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे यांच्या कार्याची दखल सुध्दा घेण्यात आली अन्याय अत्याचारांना वाचा फोडणे गोर गरीब समाजाला न्याय मिळवून देणे शासकीय रूग्णालय असो किंवा पोलीस स्टेशन शाळा असो किंवा कॉलेज गरजुवंताच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणार नेतृत्व कोरोना काळात सुध्दा स्व:ताच्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र कोरोनाग्रस्त पेशंटसाठी त्यांच्या नातेवाईकांसाठी धाऊन जाणारा एक ध्येयवेडा आंबेडकरी चळवळीत शेकडो गुन्हे अंगावर घेण्याची तयारी प्रश्न मार्गी लावण्याची जिद्द असणारा प्रामाणिकपणे कार्य करणारा फुले शाहू आंबेडकर यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी झगडणारा संघर्षवादी अक्षय धावारे यांच्या कार्याची दखल युवा भिम सेना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश आण्णा डोलारे यांनी घेऊन राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.














