वाघाच्या हल्यात महिला जागीच ठार

0
374

तिरुमलेश कंबलवार
प्रतिनिधी गडचिरोली

अहेरी – कापसाच्या शेतात काम करताना वाघाच्या हल्ल्यात महिला जागीच ठार झाल्याची घटना आज दि ७ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली. सुषमा देवदास मंडल (अंदाजे ५०) रा. चिंतलपेठ ता. अहेरी असे महिलेचा नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार सदर महिला ह्या मुलचेरा तालुक्यातील मथुरानगर येथील रहिवासी असून मागील १५ ते २० वर्षांपासून चिंतलपेठ येथे स्थायी झाले. घरी किराणा दुकान असून त्या ठिकाणी शेती सुद्धा करतात. दरम्यान रविवारी सकाळच्या सुमारास शेतात कापूस वेचणी करताना अचानक वाघाने झडप घेऊन हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात महिला जागीच ठार झाली असून मंडल परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

या घटनेची माहिती मिळताच अहेरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी आरती मडावी यांनी घटनास्थळी रवाना झाले आहे. मागील काही दिवसांपासुन मुलचेरा तालुक्यातील विविध भागात वाघाचे दर्शन होत आहे. या अगोदर मुलचेरा तालुक्यात वाघाने पाळीव प्राण्यांवर हल्ला केला होता. नुकतेच काही दिवसांपूर्वी कोठारी ते कोपरअली रस्त्यावरील मल्लेरा जवळ काही लोकांना वाघाचे दर्शन झाले होते. अन रविवार सकाळच्या सुमारास चिंतलपेठ येथे वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना समोर आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here