प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
पुणे- जिल्ह्यातील (आंबेगाव.ता) कळंब या गावातील बाबुराव सखाराम कानडे यांचा मुलगा योगेश बाबुराव कानडे ग्रामसेवक यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून समस्त साळवे भावकीची महार वतनाची वडिलोपार्जोत (जमीन) गट क्रमांक 372 अ. ब. क., 353 यापैकी एका जमिनीवर अनधिकृत पक्क बांधकाम करून सदरची महार वतनी जागा गिळकृत करण्याचा प्रयत्न करीत आहे. मागासवर्गीय युवक स्वयं रोजगार मार्गदर्शन समिती कळंब/ मुंबई, (रजि). या संस्थेचे सागर मारुती साळवे (अध्यक्ष), दत्ता साळवे (उपाध्यक्ष) यांनी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन चे प्रदीप गौतम साळवे (नवी मुंबई निरक्षक) यांना लेखी स्वरुपात तक्रार देण्यात आले व सुरेश मोहिते (महाराष्ट्र सरचिटणीस) यांच्या आदेशानुसार, मु. पो. कळंब ता. आंबेगाव जि.पुणे इथे साळवे भावकीची वडिलोपार्जत महार वतन चे जमीन योगेश बाबुराव कानडे (ग्रामसेवक) यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून कोणतेही शासकीय परवानगी न घेता महार वतनी(हाडकी) जमीन या ठिकाणी घराचे पक्के बांधकाम आपल्या पदाच्या जोरावर चालू ठेवले आहे, अशाप्रकारे साळवे की त्यांच्यावर अन्याय होत आहे, साळवे भावकी यांची तक्रार आली असून संविधानिक पदावर बसलेले योगेश बाबुराव कानडे (ग्रामसेवक) यांची सखोल चौकशी करून संपूर्ण माहिती मिळवून, शासनाच्या नियमाचे उल्लंघन केल्यास प्रशासन च्या नियम अनुसार त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व कळंब ग्रामपंचायत ची मोजणी गृहीत न धरता,जोपर्यंत प्रशासकीय नियमाप्रमाणे सरकारी मोजणी दोन्ही पक्षाकडून होत नाही, तोपर्यंत कोणतेही हुकूमशाही पद्धतीने अतिक्रमण करण्याचा अधिकार नसून काम स्थगित करण्यात यावं. दोन्ही पक्षांकडून भविष्यात वाद उदभावल्यास याची संपूर्ण जबाबदारी गट विकास अधिकारी व तहसीलदार कार्यालय याची असेल याची नोंद घ्यावी. असे निवेदन गटविकास अधिकारी व तहसील कार्यालय घोडेगाव या ठिकाणी निवेदन देण्यात आले व तहसीलदार अधिकारी संजय शिवाजीराव नागटिळक साहेबांनी आश्वासन देण्यात आले की “लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे पंकज सरोदे (आंबेगाव तालुका उपाध्यक्ष), धनेश राजगुरू (आंबेगाव तालुका संपर्कप्रमुख), मधुकर चाबुकस्वार, (आंबेगाव तालुका महासचिव) अनिल गायकवाड (तालुका उपाध्यक्ष), सुरेश रोकडे (आंबेगाव तालुका सचिव),साधू शेठ लवांडे (सल्लागार), रोहिदास शिशुपाल (महाळुंगे पडवळ सचिव), अविनाश रोकडे(तालुका सचिव), शुभम जेटके (सचिव), संभाजी राजगुरू (उपाध्यक्ष), ज्ञानेश्वर गाडेकर (सदस्य), प्रमोद बारवे(सदस्य), आशुतोष लवांडे (सदस्य) नफीस भाई शेख (संघटक),रतन साबळे (सदस्य), बाळासाहेब वाघ(सदस्य), उमेश शहा (सदस्य), ॲड.रणजीत सुरेश यादव (सदस्य), दिपाली साबळे,(वं.ब.महिला.आ. तालुका अध्यक्ष), संगीता मिरके (तालुका उपाध्यक्ष), रेश्मा राजगुरू (तालुका उपाध्यक्ष) पदाधिकारी व कार्यकारी सदस्य उपस्थित होते.

