prabodhini news logo
Home चंद्रपूर निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत अव्वल

निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत अव्वल

0
185

गोंडवाना विद्यापीठाची शैक्षणिक सत्र 2022 -23 ची गुणवत्ता यादी झाली प्रकाशित

भद्रावती प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

गोंडवाना विद्यापीठाची शैक्षणिक सत्र 2022-23 ची गुणवत्ता यादी प्रकाशित झाली असून या यादीमध्ये स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवीत बि . एससी च्या दोन विद्यार्थिनींनी आपले स्थान गुणवत्ता यादीत निश्चित केले आहे यात कु. विभा संतोष कुमार तातेड हिने गुणानु क्रमांक तिसरा तसेच ऐश्वर्या राजीव कुमार तिवारी हिने चौथा गुणानु क्रमांक मिळवीत गुणवत्ता यादीत आपले नाव नोंदविले. या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. लेमराज लडके याच्या नेतृत्वात महाविद्यालयातील प्राध्यापक वृदांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

या महाविद्यालयातील उपरोक्त विद्यार्थ्यांनी गोंडवाना विद्यापीठा अंतर्गत शैक्षणिक सत्र 2022- 23 मध्ये गुणवत्ता यादीत तसेच उज्वल यश संपादन केल्याबद्दल भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ विवेक नि शिंदे, सचिव प्रा डॉ कार्तिक नि शिंदे, सहसचिव प्रा डॉ विशाल नि शिंदे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लेमराज लडके तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here