prabodhini news logo
Home चंद्रपूर चिकमारा येथे १० दिवसीय धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिरचे समारोपीय कार्यक्रम संपन्न

चिकमारा येथे १० दिवसीय धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिरचे समारोपीय कार्यक्रम संपन्न

0
188

सिंदेवाही प्रतिनिधि,
प्रबोधिनी न्यूज

सिंदेवाही तालुक्यातील चिकमारा येथे दि. १४/१/२०२४ ला धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचे समारोपीय कार्यक्रम दुपारी १२.३० वा. चिकमारा येथे घेण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष अश्विनीताई लोणारे, तर प्रमुख पाहुणे डॉ.राजपाल खोब्रागडे , घनश्याम भडक,जिल्हा कोष्याध्यक्ष, लोमेश खोब्रागडे केंद्रीय शिक्षक तथा जिल्हा प्रचार पर्यटन उपाध्यक्ष, जगदीश सेमस्कर, जि. एम.बाबोळे मूल शहर अध्यक्ष, सिध्दार्थ बांबोळकर उपाध्यक्ष संरक्षण मूल, रविभाऊ अलोने अध्यक्ष बौध्द समाज चिकमारा,अंबादास कोसे प्रचार पर्यटन उपाध्यक्ष सिंदेवाही, सुरेश गोवर्धन, उषाताई दुर्गे केंद्रीय शिक्षिका मूल,शोभा खोब्रागडे समता सैनिक दल पेटगाव,कांता अलोने, महानदा गेडाम, वानिता गेडाम, ऋषिजी खोब्रागडे इत्यादी पाहुणे उपस्थित होते.
महापुरुषाना पुष्पमाला, दीप प्रज्वलित करून.वंदना घेण्यात आली.डॉ.राजपाल खोब्रागडे यांच्या हस्ते ध्वजा रोहण करण्यात आले. प्रास्ताविक – अंबादास कोसे यांनी केले. प्रशिक्षणार्थी मनोगत – श्रुती खोब्रागडे, वनिताताई गेडाम, अनामिका दरडमारे, भूमिका आलोने, अंशु अलोने, चांदनीताई अलोने, रिताताई लोणारे,भावनाताई गोवर्धन, प्रियंका अलोने मनोगत व्यक्त केले. सत्कार – केंद्रीय शिक्षिका उषा दुर्गे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच प्रशिक्षणार्थी उपासिकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. सूत्रसंचालन – संयोगिता गेडाम यांनी तर आभार श्रुती खोब्रागडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here