कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
आदिवासी माना जमात मिनघरी तथा विद्यार्थी युवा संघटना मिनघरी यांच्या वतीने आयोजित मिनघरी येथे नागदिवाळी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी ५ वाजता ग्रामसफाई ७ वाजता मुठपुजा तथा झेंडा वंदन करण्यात आले.
त्यानंतर दुपारी १२ वाजता मार्गदर्शन सोहळा पार पडला.
यावेळी अध्यक्ष मा.अमोल नागोसे नाचनभट्टी तर प्रमुख मार्गदर्शक मंदाताई चौके लाडबोरी विमीत दहिवले उपसरपंच ग्रामपंचायत मिनघरी हे होते. अमित घोडमारे धूमनखेडा ज्योती बगडे, श्रावण बारेकर उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची बगडे तथा प्रास्ताविक लखन नन्नावरे यांनी केले. सायंकळी ६ वाजता जनजागृती रॅली काढण्यात आली.रात्रौ ८ वाजता जागर क्रांतीचा हा सांस्कृतिक कार्यक्रम कलामंच सिंदेवाही यांनी सादर केला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन शुभांगी आत्राम सरपंच ग्रामपंचायत मिनघरी यांनी केले.
तर सहउद्घाटक विमित दहिवले, उपसरपंच ग्रामपंचायत मिनघरी हे होते.यावेळी किशोर गायकवाड सदस्य ग्रामपंचायत मिनघरी, मुरलीधर मडावी माजी सदस्य पंचायत समिति सिंदेवाही, विनेश झोडे, उमाजी झोडे, उत्तरा गुरनुले, हिवराज बोरकर सदस्य ग्रामपंचायत मिनघरी उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी निच्छय बगडे, स्वप्नील नन्नावरे रुपेश नागोसे, प्रफुल्ल बगडे, पल्लवी बगडे, प्रेमीला नन्नावरे, नीता धारणे कमला चौधरी, अरुण नन्नावरे, नागेश्वर बगडे, दादाजी बगडे तथा मिनघरी येथील नागरिकांनी सहकार्य केले.

