prabodhini news logo
Home चंद्रपूर श्री. प्रभु रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठापना निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने उद्या 11 प्रकारच्या...

श्री. प्रभु रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठापना निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने उद्या 11 प्रकारच्या भातांचा महाप्रसाद

0
130

गांधी चौक येथे कार्यक्रमाचे आयोजन, सुंदरकांड सह विविध धार्मीक कार्यक्रम

जास्मिन शेख
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर

उद्या सोमवारी अयोध्या येथे रंगणार असलेल्या प्रभु रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठापना निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महानगर पालिका पटांगणात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी 11 प्रकारच्या भातांचा महाप्रसाद वितरित केल्या जाणार आहे.
उद्या सोमवारी अयोध्ये येथे आयोजित प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी संपुर्ण देश सज्ज झाला आहे. चंद्रपूरातही आमदार किशोर जोरगेवार यांनी या निमित्त विविध धार्मीक स्थळी स्वच्छता मोहिम राबवायला सुरवात केली आहे. तर उद्या आमदार किशोर जोरगेवार संस्थापक अध्यक्ष असलेल्या यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महानगर पालिकेच्या पटांगणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8.00 वाजता पासून भव्य एलईडी स्क्रीन वर अयोध्या मंदिर प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे. सकाळी 8.30 वाजता लखमापूर भजन मंडळाच्या वतीने सुंदरकांड चे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 1 वाजेपासून संस्कार टिव्ही फेम भजन सम्राट दिनेशजी शर्मा याच्या भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्हा भात उत्पादक जिल्हा असल्याने 11 प्रकारच्या भातांचे महाप्रसाद वितरीत केल्या जाणार आहे. दुपारी 1 वाजाता या महाप्रसाद कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. रामभक्तांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here