prabodhini news logo
Home चंद्रपूर पट्टेदार वाघाच्या हल्यात गुराखी जखमी

पट्टेदार वाघाच्या हल्यात गुराखी जखमी

0
221

सिंदेवाही तालुक्यातील रामाळा येथील घटना

नागरीकात भितीचे वातावरण

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

सिंदेवाही वनपरीक्षेत्र अंतर्गत उपवनपरीक्षेत्र नवरगाव येथील नाचनभट्टी बीटातील रामाळा येथील रहवासी नामदेव डोमळु मेश्राम वय 70 वर्ष हे शेळ्या चराईसाठी गावाजवळील डोंगरी परिसरात गेले असता दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवला सोबत असणारे अरुन पेटकुले यांनी आरडा ओरड करून प्रतिकार केल्याने वाघाने पळ काढला त्यामुळे मेश्राम यांचा जिव वाचला. त्यांना ह्या हल्यात गंभीर दुखापत झाली असुन प्राथमिक आरोग्य ग्रामीन रुग्नालय सिंदेवाही येथे उपचारार्थ दाखल करुण उपचार सुरु आहेत. वनविभाग यांनी सदर घटना स्थळी हजर होवून पंचनामा केलेला आहे अगदी गावाशेजारी शेतशिवारात हया पट्टेदार वाघ हल्ले करीत असल्याने गावकरी जनतेत दहशत निर्मान झालेली आहे या वाघाचा बदोबस्त करुण जखमीला योग्य ती मदत वनविभाग यांनी करावी अशी मागणी सरपंच अरविंद मेश्राम यांचे सह गावकरी जनतेनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here