prabodhini news logo
Home चंद्रपूर खरबी येथील युवकांनी केला काॅंग्रेस पक्षात प्रवेश

खरबी येथील युवकांनी केला काॅंग्रेस पक्षात प्रवेश

0
150

युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केला पक्षप्रवेश

रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज

सद्या बेरोजगारीची मोठी झळ युवा वर्गाला बसत आहे. शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने युवा हताश झाला आहे. स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारामुळे उमेदवारांची नाउमेद होत आहे. वेगवेगळ्या भूलथापा देऊन युवकांचे लक्ष विचलित करण्याचे कारस्थान सद्याचे सरकार पद्धतशीरपणे करत असले तरी युवकांच्या ही गोष्ट लक्षात येत आहे. युवकांच्या मुख्य प्रश्नांवर काँग्रेस पक्ष आवाज उठवत असल्याने युवा वर्ग काँग्रेसशी जोडला जात आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विकासकामांवर विश्वास ठेवत व युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ब्रम्हपूरी तालुक्यातील खरबी येथील अनेक युवकांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

यावेळी युवकांच्या गळ्यात काॅंग्रेस पक्षाचा दुप्पटा घालून नवप्रवेशित युवकांचे युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवार यांनी स्वागत केले. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, काॅंग्रेस पक्ष हा युवकांना भरारी देण्याचे काम करीत असुन काॅंग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत आहे. राजकारणासोबत युवकांनी आपण समाजाचं काही तरी देणं लागतो म्हणून समाजाची देखील सेवा करावी असं सांगितलं.

यावेळी युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमित कन्नाके यांच्या नेतृत्वाखाली सौरभ मुळे, अक्षय हजारे, राहुल मुळे, प्रितम सोरते, प्रज्योत मुळे, शंतनु हजारे, आदित्य दाणी, विनोद बावनथडे, महेश नवघडे, राजेश सोरते, आदर्श चहांदे, मोहित नागोसे, अमर उरकुडे यांनी पक्षप्रवेश केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here