नागभीड येथे नि:शुल्क बौद्ध धम्मीय उपवर-वधू परिचय मेळावा

0
231

सोनाली कोसे
तालुका प्रतिनिधी
नागभिड

कोरोना महामारीच्या निर्बंधामुळे सतत दोन वर्ष सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांना बंधने आली होती. यावर्षी बंधने हटविण्यात आल्याने माता रमाई, ब्रम्हपुरी यांच्या विद्यमाने रविवार दिनांक 04 फेब्रुवारी 2024 ला सकाळी 10 00 वाजता आनंद बौद्ध विहार, आंबेडकर वार्ड, नागभीड येथे कोरोना चे सर्व नियम पाळून नि:शुल्क वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे
उपवर-वधू यांची नोंदणी सकाळी 10 00 ते 11 00 च्या दरम्यान मेळाव्या स्थळी करण्यात येईल. उपवर-वधू यांनी मेळाव्यात येतांना आपला पासपोर्ट साइज चा फोटो सोबत आणावा. विशेष सहयोग समस्त ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, उमरेड, नागपूर, देवरी, वर्धा, अर्जुनी, अहेरी, तसेच या परिसरातील खेडेगावातील बौद्ध समाज बांधवांच्या सहयोगाने या परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून समाज बांधवांनी मोठ् या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन आयोजक रमेश बागडे, घनश्याम रामटेके, यांच्या सहकार्याने घेण्यात येनार आहे.

आयोजक
रमेश बागडे मो नं:- 09767659492
घनश्याम रामटेके मो नं:- 09765996042

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here