
प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
यवतमाळ प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून यवतमाळातील शासकीय धान्य गोदामात पहिल्यांदाच ध्वजारोहणाला सुरुवात करण्यात आली.
देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्याचा बहुमान गोदामाचे ज्येष्ठ हमाल कामगार ज्ञानेश्वर शेळके यांना देण्यात आला. त्यांच्या हस्ते २६ जानेवारीला ध्वजारोहण करून संविधानिक मूल्य रुजविण्यात आले.
आंतरराष्ट्रीय नामांकन प्राप्त असलेल्या यवतमाळच्या या शासकीय धान्य गोदामातील प्रत्येकासाठी हा अविस्मरणीय क्षण होता. या सुवर्ण सोहळ्यात सर्व हमाल बांधव, रास्त भाव दुकानदार, वाहतूक यंत्रणा तर सक्रिय सहभाग नोंदवला होता. यावेळी या ध्वजारोहण कार्यक्रमाला तहसील कार्यालयातील निरीक्षण अधिकारी बीजवे, कहारे, गोरलेवार , चींचोरे सर्व नायब तहसीलदार यांनी उपस्थित राहून मान वाढवला.
जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसिलदार योगेश देशमुख आणि निरीक्षण अधिकारी बीजवे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दिड वर्षांपूर्वी गोदाम व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत सतीश मदन डोंगरे यांनी गोदामांचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या गोदामाला आयएसओ नामांकन मिळवून उत्कृष्ट गोदाम व्यवस्थपकाचा मान देखील मिळवला.
यासाठी रास्तभाव दुकानदार, हमाल कामगार, गोदाम व्यवस्थापन कर्मचारी, वाहतूक यंत्रणेचे मनोज जैस्वाल यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे मत गोदाम व्यवस्थापक सतीश डोंगरे यांनी यावेळी व्यक्त केले.
या ध्वजारोहण कार्यक्रमात नीलम एस. डोंगरे, पुरवठा निरीक्षक सीमा दोंदल, अव्वल कारकून शीरभाते, आरती बागवान, वर्षा पडवे, मनोज पसारी, शिवा आडे, अमोल चौहान व इतर रास्त भाव दुकानदार, देवानंद शेळके, प्रवीण शेळके, आशिष शेळके व इतर हमाल बांधव परिवारासह उपस्थित होते.














