श्री.ह.भ.प.गोवर्धन महाराज पंढरपूरकर यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली सांगता

0
58

बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हा कार्यक्रम श्री जाग्रत हनुमान विठ्ठल रुकमिणी मंदिर येथील अखंड हरीनाम सप्ताह कार्यक्रमात ह.भ.प.गुरुवर्य वै.ब्रम्हचैतन्य तात्यासाहेब आबा वासकर महाराज व.वै वामन महाराज पंढरपूरकर यांच्या आशिर्वादाने व ह.भ.प .गुरुवर्य विठ्ठल दादा वासकर महाराज यांच्या प्रेरणेने दिनांक 25 जानेवारी ते 31जानेवारी या कालावधीतअखंड हरीनाम सप्ताहाचा शेवट काल्याच्या किर्तनाने सांगता झाली आहे.
कालच्या किर्तनानिमित्य सकाळी गावातून वाजत गाजत महिलांनी डोक्यावर कलस घेवून मिरवणूक काढण्यात आली आहे.
पहाटे 4ते 6 काकडा सकाळी 7 ते 11पारायण दुपारी 12 ते 2 गाथा भजन.दुपारी.3ते 5 रामायण. सायंकाळी 6 ते 7 हरीपाठ रात्री.8.30 ते 11 हरीकिर्तन 12 ते 4 हरिजागर झाले आहे.

या सात दिवस झालेल्या कार्यक्रमात किर्तनकार दिनांक.25 जानेवारी गुरुवार रोजी श्री.ह.भ.प. कृष्णा महाराज पंढरपूर कर.दिनांक. 26 जानेवारी शुक्रवार रोजी श्री.ह.भ.प. बंडा महाराज अलगरवाडीकर.व याच दिवशी श्री.ह.भ.प. निवृती महाराज पंढरपूरकर यांचे गुलालाचे किर्तन होईल.दिनांक.27 जानेवारी शनिवार रोजी श्री. ह.भ.प.पांडूरंग महाराज सुमठानाकर. दिनांक.28 जानेवारी रविवार रोजी श्री.ह.भ.प. महेश महाराज माकणीकर.दिनांक.29 जानेवारी सोमवार रोजी श्री.ह.भ.प.चिंतामणी घोडके महाराज पंढरपूरकर. दिनांक 30 जानेवारी मंगळवार रोजी श्री.ह.भ.प. गुरुवर्य.प्रभूराज महाराज वासकर पंढरपूरकर दिनांक.31 जानेवारी बुधवार रोजी श्री .ह.भ.प. गोवर्धन महाराज पंढरपूरकर याच्या काल्याच्या किर्तनाने सांगता झाली आहे. गाथा भजन हरीपाठ काकडा रामायण हरीकिर्तन हरीजागर आदी कार्यक्रम घेण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here