बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज
लोहारा=उदगीर तालुक्यातील करडखेल बीटचे शिक्षण विस्तार अधिकार व्यंकट नरसिंगराव बोईनवाड हे 39 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवा पुर्ण करुन सेवानिवृत्त सेवापूर्ती झाल्याने करडखेल बिट अंतर्गत येणाऱ्या शाळेच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ व विभागस्तरीय भव्य शिक्षण परिषद सेवापुर्ती गौरव सोहळा 31जानेवारी रोजी बुधवारी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा करडखेल येथे सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा संपन्न झाला.
पहिल्यादा सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन दिपप्रज्वलन करून स्वागत गिताने आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले आहे.
या कार्यक्रम प्रसंगी व्यंकट बोईनवाड यांचा पत्नी व कुटूंबांसह भर पेहराव कपडयाचे आहेर करून भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला आहे .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी शफी शेख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी शिवशंकर पाटील.केंद्र प्रमुख संगिता पाटील.सरपंच पार्वती मुसने.उपसरपंच सुनंदा मुळे.शिक्षक नेते.किशन बिरादार. वैजनाथ बावगे.तानाजी पाटील.मुख्याद्यापक रामदास हल्लाळे. गटशिक्षणाधिकारी संजय सिंदाळकर देवणी. शिक्षणविस्तार अधिकारी लोहकरे उदगीर.शिक्षण विस्तार अधिकारी सुर्यवंशी उदगीर.शिक्षण विस्तार अधिकारी राजेसाहेब शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी शिंदे.बालूरे.शिरीष रोडगे. एस.पी.मुंडे. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पद्माकर कुंभार.व ग्रामस्थ नातेवाईक मित्रमंडळी, सहकारी आदी उपस्थित होते .
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सरांच्या कार्याचा उहापोह केला व त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. असून देवणी उदगीर शिरूर अनंतपाळ चाकूर निलंगा तालुक्यातील शिक्षक मित्रानी विस्तार अधिकारी मित्राचा सन्मान केला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामला पाटील यांनी केले तर आभार विठ्ठल होणाळे यांनी मानले.

