महावितरणच्या कारभाराची पोलखोल

0
189

सुभाष दरेकर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज अहमदनगर
9858322466

श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील एका गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांवर महावितरणच्या बेजबाबदार पणामुळे झाला अन्याय आपले महावितरण कंपनीतील बेजबाबदार कारभारा बाबतचा एक नमुना समाजाच्या निदर्शनास आला आहे! वरील कागदपत्रे हि हिरडगाव येथील नागू मारूती ठवाळ अशिक्षित,गरीब आणि मागासवर्गीय कुटूंबाची आहेत. त्याने ए वन फॉर्म भरून दोन पोल, पाच एच् पी विज जोड मागणी केली होती! ती मंजूर होऊन त्याने १ जून २०२० रोजी रूपये ९३०७ डिपाॅजीट भरले आहे. वरील कागदपत्रांवरून दिसून येते की, १ फेब्रुवारी २०२३ रोजी त्याचा विज पुरवठा सुरू केला आहे. त्यानंतर त्यास मे २०२३ मध्ये २८१०/- वीज बील आले आहे! संबंधित ग्राहकाने जुलै २०२३ मध्ये बिल भरले आहे.

महत्वाचे म्हणजे पोल नाही विज जोडणी नाही कामच झालेले नाही. तरी बिल चालू झाले आहे. संबंधित ठेकेदाराने काम केले असे दाखवून कामाचे बील काढून सदर विज ग्राहकाला वीज बिल सुरू झाले आहे! असे दिसून येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा हेलपाटे मारुन सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही.
गरीब, अशिक्षित मागासवर्गीय ग्राहकाला न्याय मिळवा म्हणून गावातील सर्वच स्तरातून मागणी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here